उसेन बोल्टचे 'स्प्रिंट स्वीप'च्या हॅट्ट्रिकचे लक्ष्य

By admin | Published: July 21, 2016 06:40 PM2016-07-21T18:40:23+5:302016-07-21T18:40:23+5:30

जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट रिओ आॅलिम्पिकमध्ये 'स्प्रिंट क्लीन स्वीप'ची 'हॅट्ट्रिक' साधण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

Hiten's goal for Usain Bolt's 'Sprint Sweep' | उसेन बोल्टचे 'स्प्रिंट स्वीप'च्या हॅट्ट्रिकचे लक्ष्य

उसेन बोल्टचे 'स्प्रिंट स्वीप'च्या हॅट्ट्रिकचे लक्ष्य

Next

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २१ : जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट रिओ आॅलिम्पिकमध्ये 'स्प्रिंट क्लीन स्वीप'ची 'हॅट्ट्रिक' साधण्याच्या इराद्याने उतरणार आहे. मागील आठ वर्षांपासून धावत असलेल्या बोल्टचे हे  अखेरचे आॅलिम्पिक असेल. सध्याच्या युगातील महान खेळाडूंमध्ये गणना होत असलेले मोहम्मद अली, मायकेल जॉर्डन आणि जॅक निकोलस यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत बोल्टने आधीच स्थान पटकविले आहे.

रिओचे तिकीट मिळविणाऱ्या बोल्टने आठ वर्षांपासून वेगवान शर्यतीवर स्वत:चा ठसा उमटविला शिवाय तो कायम राखला.
तो १००, २०० आणि ४ बाय ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण विजेता आहे. यंदा ही तिन्ही पदके जिंकून त्याचा हॅट्ट्रिक साधण्याचा इरादा आहे. ३० वर्षे पूर्ण करण्याच्या एक दिवस आधी २० आॅगस्ट रोजी रिओत नवव्या आॅलिम्पिक फायनलमध्ये सहभागी होईल.
 जखम आणि फिटनेसची समस्या फेटाळून लावणारा बोल्ट म्हणाला, ' मी रिओसाठी पूर्णपणे सज्ज आहे. बोल्टने पहिल्यांदा बीजिंग आॅलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण शंभर मीटर दौडीत जिंकले तेव्हा पाच दिवसानंतर त्याचा २२ वा वाढदिवस होता. ९.६९ सेकंदांसह त्याने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यानंतर जमैकाच्या या खेळाडूने कधीही मागे वळून पाहिलेले नाही. जगातील

क्रीडा चाहते त्याचे 'फॅन' बनले. त्याने ११ वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविण्यासोबतच बीजिंग आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये त्याने तिन्ही प्रकारात सुवर्ण पदके जिंकली होती. २०११ मध्ये मात्र विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चुकीची सुरुवात केल्याने बोल्टला चक्क स्पर्धेबाहेरच पडावे लागले.

आॅलिम्पिकमधील मोठा चेहरा आणि सेलेब्रिटी मानल्या जणाऱ्या बोल्टच्या रिओतील सहभागाविषयी सस्पेन्स कायम होता. स्रायू दुखावताच तो जमैकाच्या निवड चाचणीत सहभागी होऊ शकला नव्हता.

Web Title: Hiten's goal for Usain Bolt's 'Sprint Sweep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.