हॉकी इंडियातर्फे ३५ संभाव्य खेळाडूंची घोषणा; १३ ज्युनियर्सना संधी, आशिया चषकासाठी संघ निवडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:03 AM2017-08-26T01:03:50+5:302017-08-26T01:04:07+5:30

हॉकी इंडियाने आज शनिवारपासून साई केंद्रात सुरू होत असलेल्या ४० दिवसांच्या तयारी शिबिरासाठी संभाव्य ३५ जणांची नावे जाहीर केली. त्यात ज्युनियर विश्वचषक विजेत्या १३ जणांचा समावेश करण्यात आला.

Hockey India announces 35 potential players; 13 juniors will choose the opportunity for Asia, Asia Cup | हॉकी इंडियातर्फे ३५ संभाव्य खेळाडूंची घोषणा; १३ ज्युनियर्सना संधी, आशिया चषकासाठी संघ निवडणार

हॉकी इंडियातर्फे ३५ संभाव्य खेळाडूंची घोषणा; १३ ज्युनियर्सना संधी, आशिया चषकासाठी संघ निवडणार

Next

बेंगळुरु : हॉकी इंडियाने आज शनिवारपासून साई केंद्रात सुरू होत असलेल्या ४० दिवसांच्या तयारी शिबिरासाठी संभाव्य ३५ जणांची नावे जाहीर केली. त्यात ज्युनियर विश्वचषक विजेत्या १३ जणांचा समावेश करण्यात आला. भारतीय वरिष्ठ संघ ढाका येथे होणाºया हिरो आशिया चषकात सहभागी होणार असून स्पर्धेला ४५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
ज्युनियर विश्वविजेत्या संघाचा गोलकिपर विकास दहिया, बचावफळीतील दिप्सन तिर्की, हरमनप्रीतसिंग, गुरिंदरसिंग, वरुण कुमार, मिडफिल्डर हरजीतसिंग, मनप्रीत ज्युनियर, निलकांता शर्मा आणि सुमित, आक्रमक फळीतील मनदीपसिंग, गुरजंतसिंग, सिमरनजितसिंग आणि अरमान कुरेशी तसेच गोलकिपर सूरज करकेरा यांना शिबिरासाठी पाचारण करण्यात आले. भारताने युरोप दौºयात सलग दोन सामन्यात नेदरलॅन्डला नमविले. नंतर आॅस्ट्रियावर देखील विजय साजरा केला. पाच सामन्यांच्या युरोप दौºयात सहा खेळाडूंनी सिनियर संघात पदार्पण केले. वरुण गुरजंत आणि अरमान यांनी तर पहिला आंतरराष्टÑीय गोल देखील नोंदविला.
शिबिरात युवा खेळाडूंसोबतच अनुभवी सरदारसिंग, एस.व्ही. सुनील, कोथाजितसिंग, चिंगलेनसनासिंग, एस.के. उथप्पा, रमणदीपसिंग, आकाशदीपसिंग यांचाही समावेश करण्यात आला. युरोप दौºयात संघाची धुरा सांभाळणारा मनप्रीत म्हणाला,‘नव्या चेहºयांनी युरोप दौºयात शानदार कामगिरी केल्यामुळे आमच्याकडे खेळाडूंचा पूल मोठा झाला. आशिया चषक जिंकायचाच, यात दुमत नाही. त्याआधी आमच्या उणिवा दूर करण्यासाठी हे शिबिर आहे.’ (वृत्तसंस्था)

संभाव्य भारतीय हॉकीपटू
गोलकीपर : आकाश चिकटे, पी. आर. श्रीजेश, विकास दहिया, सूरज करकेरा . बचावफळी: दिप्सन टिर्की, प्रदीप मोर, वीरेंद्र लाकरा, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, रूपिंदर पालसिंग, हरमनप्रीत सिंग, जसजीत सिंग कुलार, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास, वरुण कुमार. मधली फळी: चिंगलेनसना सिंग, एस. के. उथप्पा, सुमीत, सतबीरसिंग, सरदारसिंग, मनप्रीतसिंग, हरजीतसिंग, नीलकांता शर्मा, मनप्रीत ज्युनियर, सिमरनजीतसिंग. आक्रमक फळी: रमणदीपसिंग, एस. वी सुनील, तलविंदरसिंग, मनदीपसिंग, अफ्फान युसूफ, नितीन थिमय्या, गुरजंत सिंग,आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय व अरमान कुरेशी.

Web Title: Hockey India announces 35 potential players; 13 juniors will choose the opportunity for Asia, Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.