हॉकी : भारताने कॅनडाचा उडवला धुव्वा; आज पाकिस्तानशी लढत

By admin | Published: June 18, 2017 03:16 AM2017-06-18T03:16:55+5:302017-06-18T03:16:55+5:30

भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज येथे हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्य कॅनडाचा ३-0 असा धुव्वा उडवताना आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

Hockey: India fires Canada; Today, fighting Pakistan | हॉकी : भारताने कॅनडाचा उडवला धुव्वा; आज पाकिस्तानशी लढत

हॉकी : भारताने कॅनडाचा उडवला धुव्वा; आज पाकिस्तानशी लढत

Next

लंडन : भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज येथे हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्य कॅनडाचा ३-0 असा धुव्वा उडवताना आपला सलग दुसरा विजय नोंदवला.
भारतासाठी एस. व्ही. सुनीलने पाचव्या मिनिटाला, आकाशदीपसिंहने १0 व्या मिनिटाला आणि सरदारसिंह याने १८ व्या मिनिटाला गोल करीत ब गटाच्या सामन्यात पूर्ण तीन गुण मिळवून दिले. या विजयाने भारताने स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी जवळपास निश्चित केली आहे. भारताने गुरुवारी सुरुवातीच्या लढतीत स्कॉटलंडवर ४-१ गोलने दणकेबाज विजय नोंदवला होता. आता सहाव्या मानांकित भारताचा पुढील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे.

क्रिकेट, हॉकीत एकाच वेळी भारत-पाक लढत..
भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी दुसऱ्या देशात क्रिकेट आणि हॉकीच्या मैदानावर असतील तेव्हा विराट कोहलीचा सुरेख ड्राइव्ह आणि हरमनप्रीतसिंह याचा शक्तिशाली ड्रॅगफ्लिकचा नजारा एकाच वेळेस पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ लंडनमध्ये ओव्हलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानशी दोन हात करणार आहे, तर त्यापासून ५५ मैलांपेक्षा कमी अंतरावर राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ मिल्टन येथे आपल्या पारंपरिक संघाविरुद्ध खेळणार आहे.
क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळांदरम्यान एकाच वेळी रसिकांना आकर्षित करण्याचा योग असा फारच कमी असतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय सुपर संडेचा जल्लोष साजरा करण्यास उपस्थित राहतील.
बॉलीवूड ब्रिगेड, राजकीय दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्ती क्रिकेटला उपस्थिती दशर्वण्याची शक्यता आहे, तर हॉकी विश्व लीग सेमीफायनलची लढतदेखील आकर्षण बिंदू ठरणार आहे.
जे क्रीडाप्रेमी क्रिकेटचे तिकीट खरेदी करू शकले नाहीत ते जवळपास एक तास अंतरावर असणाऱ्या मिल्टन केन्स येथे जाऊन मनप्रीतसिंह आणि एस. व्ही. सुनील यांच्यासारख्या खेळाडूंच्या कौशल्याचे साक्षीदार ठरू शकतात. पाकिस्तानविरुद्ध खेळातील स्पर्धाच नव्हे तर भारतीय जनतेत लढतीदरम्यान राष्ट्रप्रेम पाहायला मिळते. (वृत्तसंस्था)

Web Title: Hockey: India fires Canada; Today, fighting Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.