हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:39 PM2021-08-10T14:39:36+5:302021-08-10T14:42:05+5:30

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले.

Is hockey India's national game? The answer is NO, BJD wants Hockey to be declared the national sport  | हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र व्हायरल

Next

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४, १९८० मध्ये सुवर्णपद,  १९६०मध्ये रौप्य आणि १९६८, १९७२, २०२१मध्ये कांस्य अशी एकूण १२ पदकं नावावर केली आहेत. 

हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे का?
युवक कल्याण व क्रीडा खात्याचे केंद्रीय मंत्र्यानी केंद्रानं अजून कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ असे जाहीर केलेले नाही. धुळ्यातील एका शिक्षकानं दाखल केलेल्या RTIवर मंत्रालयाकडून हे उत्तर मिळाले आहे. मयुरेश अग्रवाल यांनी दाखल केलेल्या RTIमध्ये हॉकीला केव्हा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळेल, असे विचारले गेले होते. त्यावर सरकारने कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर केलेले नाही. सरकारला सर्व खेळांचा प्रसार करायचा आहे, असे उत्तर मिळाले. 


हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

ओडिशाचे मुख्यमंत्री काय म्हणतात?
२०१३पासून ओडिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. व्हायरल झालेल्या पत्रात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. 

Web Title: Is hockey India's national game? The answer is NO, BJD wants Hockey to be declared the national sport 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.