हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिक पदकाच्या मार्गावर; भारतीय पुरुष व महिला संघांच्या कर्णधारांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:12 PM2020-07-23T23:12:13+5:302020-07-23T23:12:36+5:30
नवी दिल्ली : ‘आमच्या संघाने बऱ्यापैकी चुका सुधारल्या आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूला आता जाणीव झाली आहे की, आगामी टोकियो ...
नवी दिल्ली : ‘आमच्या संघाने बऱ्यापैकी चुका सुधारल्या आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूला आता जाणीव झाली आहे की, आगामी टोकियो ऑलिम्पिकमधील यश ऐतिहासिक ठरेल. त्यामुळेच आता आमचा संघ ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या मार्गावर आहे,’ असा विश्वास मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल या भारताच्या हॉकी कर्णधारांनी व्यक्त केला आहे.
मनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणाºया भारताच्या पुरुष संघाने गेल्या वर्षात शानदार कामगिरी केली. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर पुरुष संघाने ऑलिम्पिक पात्रता मिळवली. एफआयएच प्रो लीग स्पर्धेतही पहिल्यांदा सहभागी होताना काही लक्षवेधी निकाल नोंदवले. नेदरलँड्स, विश्वविजेते बेल्जियम आणि ऑस्टेÑलियासारख्या तगड्या संघांना नमवून भारताने सर्वांनाच चकित केले होते. कर्णधार मनप्रीतने सांगितले की, ‘संघाची गेल्या वर्षातील कामगिरी पाहता यंदा आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी आमच्याकडे चांगली संधी आहे.’
पुरुष संघाप्रमाणेच महिला संघाने गेल्या वर्षी दमदार कामगिरी केली. कर्णधार राणी म्हणाली की, ‘काही महिन्यांपूर्वीच आमच्या संघाने आघाडीच्या संघांना कडवी टक्कर दिली. या कामगिरीतून आॅलिम्पिक पदक जिंकून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्याची क्षमता आमच्या संघात असल्याचे सिद्ध केले. प्रत्येक स्पर्धेगणिक आमचा संघ कामगिरी उंचावत आहे. (वृत्तसंस्था)