हॉकी वर्ल्ड लीग - कॅनडाचा भारतावर विजय

By admin | Published: June 25, 2017 07:26 PM2017-06-25T19:26:29+5:302017-06-25T19:30:28+5:30

हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत

Hockey World League - Canada beat India | हॉकी वर्ल्ड लीग - कॅनडाचा भारतावर विजय

हॉकी वर्ल्ड लीग - कॅनडाचा भारतावर विजय

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 25 - हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत कॅनडाने भारतावर 3-2 अशा फरकाने मात केली आहे. या विजयामुळे कॅनडाने या स्पर्धेत ५ वा क्रमांक पटकावला असून भारताला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकचा 6-1 असा धुव्वा उडवला होता त्यामुळे अखेरच्या सामन्यात कॅनडावर मात करेल असे वाटले होते. मात्र कॅनडाने भारतावर 3-2 अशा फरकाने सहज पराभव केला. सामन्याच्या तिसऱ्या मिनीटाला कॅनाडाच्या जॉन्सनने गोल करत आघाडी घेतली होती. पण भारताच्या हरमनप्रीतने सातव्या आणि 22 व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भराताला सामन्यात आघाडी मिळवून दिली. 
हरमनप्रीतने 3-1 अशी मिळवून दिलेली आघाडी भारतीय संघाला शेवटपर्यंत टिकवता आली नाही. कॅनडाच्या खेळाडूंनी भारतापेक्षा सरस खेळ करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. पाकिस्तान विरोधात गोलचा पाऊस पाडणारा भारतीय संघ कॅनडाविरोधात झुंजताना दिसला. हरमनप्रीतचा अपवाद वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला गोल करता आला नाही.
कॅनडाच्या संघाने मात्र मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. 2-1 अशा पिछडीवर असताना त्यांनी 40 व्या मिनीटाला गोल करत बरोबरी साधली. यानंतर जॉन्सनने आक्रमक खेळ करत 44 व्य मिनीटाला झाडत कॅनडाला 3-1 ने आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सत्रात भारताला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात हरमनप्रीतला अपयश आलं. 

Web Title: Hockey World League - Canada beat India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.