हॉग
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:05+5:302015-02-21T00:50:05+5:30
Next
>भारताकडे जेतेपद राखण्यालायक गोलंदाज नाहीत : रॉडनी हॉगमेलबोर्न : भारताकडे विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्यालायक गोलंदाजी आक्रमण नाही. भारतीय संघात उमेश यादवचा अपवाद वगळता एकही प्रभावी गोलंदाज नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रॉडनी हॉगने व्यक्त केले. कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळताना ८५ बळी घेणारा ६३ वर्षीय हॉग म्हणाला, 'भारताचा वेगवान मारा प्रभावित करणारा नाही. अशा प्रकारच्या मार्याच्या जोरावर जेतेपद राखणे शक्य होणार नाही. विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकाविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला माझी पसंती आहे. दक्षिण आफ्रिका संघात जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेन असून सर्वोत्तम फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा समावेश आहे.'हॉग म्हणाला, 'स्टेन किंवा जॉन्सन यांच्याप्रमाणे वेगवान मारा करण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज भारतीय संघात नाही. उजव्या यष्टीबाहेर मारा करण्याची रणनीती उपयुक्त सिद्ध होईल, असे वाटत नाही. मोहम्मद शमी व मोहीत शर्मा यांच्यासारखे गोलंदाज न्यूझीलंडमधील खेळप्यावर यशस्वी ठरू शकतात. भारतीय संघात मध्यमगती गोलंदाज आहेत, पण ते ऑस्ट्रेलियन खेळप्यांवर उपयुक्त ठरू शकत नाही. रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा ॲडलेडमध्ये यशस्वी ठरू शकतात.'हॉग म्हणाला, 'भारतीय गोलंदाजांमध्ये यादव मला अधिक आवडतो. तो आपल्या वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो, पण त्यासाठी त्याने अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी करणे आवश्यक आहे. यादवमध्ये वेगवान मारा करण्याची क्षमता आहे.'किम ूजच्या नेतृत्वाखाली १९७९ मध्ये भारताचा दौरा करणारा व्हिक्टोरियाचा हा वेगवान गोलंदाज म्हणाला, 'टप्पा व दिशा यावर नियंत्रण मिळविल्यानंतर यादवने आऊटस्विंगर व इनस्विंग यॉर्कर करण्याचा प्रयत्न करावा. जर त्याला स्विंग गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर त्याने वेगवान मारा करण्याचा विचार सोडावा आणि कपिलदेवप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला हवा.'हॉगने या वेळी भारताचे माजी कर्णधार कपिलदेव व सुनील गावस्कर यांची प्रशंसा केली. हॉग म्हणाला, 'आमच्या काळात कपिलदेव स्विंग मारा करण्यात वाक बगार गोलंदाज होता. टप्पा व दिशा यावर त्याचे नियंत्रण होते. भारतीय फलंदाजांमध्ये मला सुनील गावस्करला बाद करण्यात कधीच यश आले नाही. त्याचे तंत्र सर्वोत्तम होते. विश्वनाथ चांगला फलंदाज होता. चेतन चौहानचे बचावतंत्र उत्तम होते.' (वृत्तसंस्था) ०००००