आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवा - सॅमी

By admin | Published: April 3, 2016 04:59 PM2016-04-03T16:59:53+5:302016-04-03T16:59:53+5:30

इंग्लंडने आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवावे असे आव्हान वेस्ड इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने दिले आहे.

Hold us out of the square - Sammy | आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवा - सॅमी

आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवा - सॅमी

Next

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ३ - इंग्लंडने आम्हाला चौकार मारण्यापासून रोखून दाखवावे असे आव्हान वेस्ड इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने दिले आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सॅमीने हे आव्हान दिले. 
 
आमच्याकडे चौकार मारणारा संघ आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला आम्हाला चौकार मारण्यापासून रोखावे लागेल. आम्ही सुरु झाल्यानंतर आम्हाला रोखणे प्रतिस्पर्ध्याला कठिण आहे असे सॅमीने सांगितले. या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत तीस षटकार मारले आहेत तर, इंग्लंडच्या संघाने ३४ षटकार मारेल आहेत. 
 
उपांत्यफेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचे १९३ धावांचे लक्ष्य पार करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. वेस्ट इंडिजकडे ख्रिस गेल हा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. 

Web Title: Hold us out of the square - Sammy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.