हनीसिंग हाजीर हो!

By admin | Published: December 19, 2014 10:57 PM2014-12-19T22:57:06+5:302014-12-19T22:57:06+5:30

प्रोक्लॅमेशनची कार्यवाही सुरू : शासनाची हायकोर्टात माहिती

Honeyingh Hazir Ho! | हनीसिंग हाजीर हो!

हनीसिंग हाजीर हो!

Next
नई : श्री ज्ञानेश्वर महाविद्यालच्या १२ खेळाडूंनी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची लूट केले. या सर्व खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे येथे झालेल्या २८ व्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर महाविद्याचे खेळाडू अक्षय जायगुडे, संदेश अंबाडे, नितीन शिंदे, आकाश पेचे, किरण झिजुर्डे यांनी सुवर्णपदक, भागवत दरंदले, प्रशांत जायगुडे प्रितम गव्हाणे, अरुण जाधव, सौरभ पेचे यांनी रजतपदक तर प्रशांत काळे, ज्ञानेश्वर जराड यांनी कास्यपदक पटकावले. त्यांची फरिदाबाद (हरियाणा) येथे होणार्‍र्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पधेर्साठी निवड झाली आहे. या खेळाडुंचा मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अशोक शिंदे अध्यक्षस्थानी होते. सततचा सराव, ध्येय गाठण्यासाठीची जिद्द व आत्मविश्वास हेच यशस्वी खेळाडूंच्या सर्वोच्च यशाचे रहस्य आहे, असल्याचे प्रशांत गडाख यांनी सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य अरुण घनवट, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य सी. एस. पानमंद, पर्यवेक्षक प्रा. दिगंबर कुलकर्णी, क्रीडा विभागप्रमुख प्रा. सुनील गर्जे, संकेत चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर)
....
फोटो ओळी - नेवासा- राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पधेर्साठी निवड झालेल्या श्री ज्ञानेश्वर महाविद्याच्या खेळाडूं समवेत मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, उपप्राचार्य अरुण घनवट, प्रा. सुनील गर्जे (छाया - सतीश उदावंत).
.....
फोटो: १९नेवासा महाविद्यालय.

Web Title: Honeyingh Hazir Ho!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.