हाँगकाँगचा क्रिकेटपटू अडीच वर्षांसाठी निलंबित

By Admin | Published: April 21, 2016 04:15 AM2016-04-21T04:15:18+5:302016-04-21T04:15:18+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हाँगकाँग क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान अहमद याला आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अडीच वर्षांसाठी निलंबित केले आहे.

Hong Kong cricketer suspended for two and a half years | हाँगकाँगचा क्रिकेटपटू अडीच वर्षांसाठी निलंबित

हाँगकाँगचा क्रिकेटपटू अडीच वर्षांसाठी निलंबित

googlenewsNext

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हाँगकाँग क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान अहमद याला आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अडीच वर्षांसाठी निलंबित केले आहे.
अहमदवर संहितेनुसार आरोप निश्चित करण्यात आले होते. त्याआधी त्याला ४ नोव्हेंबर २०१५ रोजी अस्थायीरीत्या निलंबित करण्यात आले. नंतर एसीयूने सविस्तर चौकशी केली. अहमदवर भ्रष्टाचारात थेट सहभाग असल्याचे आरोप नव्हते; पण २०१२ ते २०१४ दरम्यान त्याला भ्रष्टाचारात सामील होण्याची आॅफर मिळाली होती. ही माहिती त्याने दडवून ठेवल्याबद्दल त्याला बंदीचा सामना करावा लागला आहे. संहितेनुसार स्वत:ची जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची अहमदने कबुली दिली. त्याने शिक्षा मान्य केली आहे. तो याविरुद्ध अपीलदेखील करू शकणार नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Hong Kong cricketer suspended for two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.