मानधनाचा शतकी तडाखा

By admin | Published: June 30, 2017 12:58 AM2017-06-30T00:58:25+5:302017-06-30T00:58:25+5:30

फिरकी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर मराठमोळ्या स्मृती मानधनाने केलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत

Honor of the Century | मानधनाचा शतकी तडाखा

मानधनाचा शतकी तडाखा

Next

टाँटन : फिरकी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर मराठमोळ्या स्मृती मानधनाने केलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना टी२० जगज्जेत्या वेस्ट इंडीजचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. विंडीजला निर्धारीत ५० षटकात ८ बाद १८३ धावांवर रोखल्यानंतर भारताने ४२.३ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले. दरम्यान, कर्णधार मिताली राज (४६) सलग ८ डावांमध्ये अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमापासून अवघ्या ४ धावांनी दूर राहिली.
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर पूनम राऊत (०) व दीप्ती शर्मा (६) स्वस्तात परतल्याने भारताची आठव्या षटकात २ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र, मानधनाने सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना मितालीसह तिसऱ्या विकेटसाठी
१०८ धावांची निर्णायक भागीदारी केली. या दोघींनी विंडीजची जबरदस्त धुलाई केली. मितालीने फॉर्ममध्ये असलेल्या मानधनाला जास्तीत जास्त स्ट्राइक दिली. मिताली ८८ चेंडूत ३ चौकारांसह ४६ धावांवर बाद झाली. मानधनाने १०८ चेंडूत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०६ धावा फटकावल्या.
तत्पूर्वी, काऊंटी मैदानावर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतीयांनी विंडीजची
कोंडी केली.
एकवेळ विंडीज दिडशेचा टप्पा पार करेल की नाही अशी शंका होती. मात्र, शानेल डेली (३७ चेंडूत ३३ धावा) व अफी फ्लेचर (२३ चेंडूत नाबाद ३६ धावा) या तळाच्या फलंदाजांनी विंडीजला सावरले. या दोघींमुळे विंडीजने ६ बाद ९१ अशा परिस्थितीतून समाधानकारक मजल मारली. याशिवाय, सलामीवीर हायली मॅथ्यूजने (५७ चेंडूत ४३) चांगली फलंदाजी केली. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने विंडीजचा डाव घसरला. लेग स्पिनर पूनम यादव, आॅफ स्पिनर दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी २ महत्त्वपूर्ण बळी घेत विंडीज फलंदाजीला खिंडार पाडले. एकता बिष्टने एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :-
वेस्ट इंडीज : हायले मॅथ्यूज झे. व गो. शर्मा ४३, स्टेफनी टेलर धावबाद (मंधना) १६, शनेल डेली यष्टीचीत वर्मा गो. शर्मा ३३, अफी फ्लेचर नाबाद ३६, अनिसा मोहम्मद नाबाद ११. एकूण : ५० षटकात ८ बाद १८३ धावा. गोलंदाजी : एकता बिष्ट १०-२-२३-१; दीप्ती शर्मा १०-१-२७-२; पूनम यादव १०-२-१९-२; हरमनप्रीत कौर ७-०-४२-२.
भारत : पूनम राऊत झे. अग्युल्लेरिया गो. कॉन्नेल ०, स्मृती मानधना नाबाद १०६, दीप्ती शर्मा त्रि. गो. ६. मिताली राज झे. फ्लेचर गो. मॅथ्यूज ४६, मोना मेश्राम नाबाद १८. एकूण : ४२.३ षटकात ३ बाद १८६ धावा. गोलंदाजी : शामिलिया कॉन्नेल ४-०-२३-१; स्टेफनी टेलर १०-१-२४-१; हायली मॅथ्यूज ८.३-०-३५-१.

Web Title: Honor of the Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.