रिले संघ फायनलमध्ये पोहोचण्याची आशा!

By Admin | Published: August 20, 2016 02:24 AM2016-08-20T02:24:34+5:302016-08-20T02:24:34+5:30

लंडन आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये टिंटू लुकाला जी संधी मिळाली त्यात तिने सर्वश्रेष्ठ प्रयत्न केला. दुर्र्दैवाने ती हिटमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. एकूण आठ हिटमधील विजेता आणि दुसऱ्या

Hope to reach the final of the relay team! | रिले संघ फायनलमध्ये पोहोचण्याची आशा!

रिले संघ फायनलमध्ये पोहोचण्याची आशा!

googlenewsNext

- पी. टी. उषा लिहितात

लंडन आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये टिंटू लुकाला जी संधी मिळाली त्यात तिने सर्वश्रेष्ठ प्रयत्न केला. दुर्र्दैवाने ती हिटमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. एकूण आठ हिटमधील विजेता आणि दुसऱ्या स्थानावरील खेळाडूंपैकी उत्कृष्ट वेळ नोंदविणारे एकूण आठ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतात, असा नियम आहे.
अशावेळी अनेक खेळाडू फायनलमध्ये पात्रतेपासून वंचित राहतात. पण त्यांना हिटमध्ये पहिल्या दोन स्थानांवर राहण्याचा लाभ होतो. कामगिरी सुधारण्यासासाठी आॅलिम्पिकपूर्वी आमच्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून द्यावी, इतकीच माझी मागणी आहे. आॅलिम्पिकमध्ये भविष्यात निराशादायी कामगिरी टाळण्यासाठी हा कार्यक्रम राबवायला हवा. गेल्या काही वर्षांपासून खेळाडूंना सातत्याने एक्स्पोझर मिळत आहे पण यात सातत्य राखायला हवे.
३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ललिता बाबर आणि २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीतील मुलींचा अपवाद वगळता अ‍ॅथ्लीटस्च्या कामगिरीवर मी समाधानी नाही. मला महिला आणि पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाकडून अद्यापही अपेक्षा आहेत. सोबतच २० किमी पायी चालणे आणि ५० किमी पायी चालणे यातही आशा असेल. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये भारताने दोनदा अंतिम फेरी गाठली आहे. मी करियरच्या सर्वोच्च शिखरावर असताना एकदा अंतिम फेरीत मी धावले. त्यानंतर २० वर्षानंतर अथेन्समध्ये २००४ साली नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवित रिले संघ अंतिम फेरीत पोहोचला. यावेळी अशीच अपेक्षा आहे. ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात महिला संघ तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेची नोंद करू शकला किंवा अंतिम फेरीत दाखल झाला तर मला सर्वाधिक आनंद होईल.
पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये जपान आणि चीनचे संघ अंतिम फेरीत दाखल झाले. यामुळे भारताला प्रेरणा मिळाली. यामुळे एक संदेश असा गेला की तुमच्या संघात बोल्ट आणि गॅटलिनसारखे खेळाडू नसतीलही पण सांघिक कामगिरीच्या बळावर यश मिळू शकते. बोल्ट आणि एलेनी थॉम्पसन यांनी १०० व २०० मीटरचे पुरुष आणि महिला गटाचे सुवर्ण जिंकून मला प्रभावित केले. पण रिओ आॅलिम्पिकमध्ये सर्वांत महान कामगिरी ४०० मीटरमध्ये द. अमेरिकेचा वेड वॉन निकीर्क याने केली. त्याने विश्व विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. (टीसीएम)

Web Title: Hope to reach the final of the relay team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.