Chess robot : बुद्धीबळाच्या पटावर हिंसा; Robot ने ७ वर्षांच्या मुलाचे तोडले बोट, समोर आला धक्कादायक Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:06 PM2022-07-25T16:06:00+5:302022-07-25T16:06:37+5:30
Chess robot grabs and breaks seven-year-old boy’s finger : रुसमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.
Chess robot grabs and breaks seven-year-old boy’s finger : रुसमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. लहान मुलांसाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेले होते आणि या दरम्यान एका रोबोटने ७ वर्षांच्या मुलाला जखमी केले. हा मुलगा जेव्हा त्याची चाल चालवत होता, तेव्हा रोबोट सक्रिय झाला आणि त्या मुलाचं बोट त्यानं तोडलं.
ABC न्यूजच्या रिपोर्ट नुसार १९ जुलैला मॉक्सो येथील मॉक्सो चेस ओपन स्पर्धेतील ही घटना आहे. या स्पर्धेत बरेच खेळाडू रोबोटसह बुद्धीबळ खेळत होते. याच दरम्यान एका पटावर रोबोटने ७ वर्षांच्या मुलाचे बोट पकडले आणि ते जोरात दाबले. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे. ज्यात रोबोटने बोट तोडल्यानंतर तो मुलगा असह्य वेदनेसह रडताना दिसतोय. जवळपास उपस्थित असलेले काही जणं त्या मुलाची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आहे.
All acquisition that advanced AI will destroy humanity is false. Not the powerful AI or breaching laws of robotics will destroy humanity, but engineers with both left hands :/
— Pavel Osadchuk 👨💻💤 (@xakpc) July 21, 2022
On video - a chess robot breaks a kid's finger at Moscow Chess Open today. pic.twitter.com/bIGIbHztar
स्पर्धा आयोजकांनी घडलेला प्रकार दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले. या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले रोबोट भाड्याने आणले गेले होते आणि त्यात आमची काहीच चूक नसल्याचे आयोजकांनी म्हटले.