दररोज खेळाचा तास व्हावा - तेंडुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:49 AM2018-05-08T00:49:32+5:302018-05-08T00:49:32+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे.
सुस्त जीवनशैलीपासून वाचवण्यासाठी नववी ते १२ वीपर्यंत दररोज खेळाचा तास ठेवण्याचे आदेश सीबीएसईने दिले. तेंडुलकरने सीबीएसईच्या अध्यक्षा अनिता करवल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘लठ्ठपणाबाबत भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे जी गंभीर व चिंतेची बाब आहे. आरोग्य आणि शारीरिक शिक्षणासाठी दररोज एक तास बंधनकारक करणे योग्य पाऊल आहे. बोर्डाने अन्य सर्व वर्गांसाठीही आरोग्य व फिटनेस बंधनकारक करण्याविषयी विचार करायला हवा.’