विनेश प्रमाणे अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन; १० तासांत ४.६ Kg वजन कमी करून जिंकलं ब्राँझ मेडल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:31 AM2024-08-10T10:31:47+5:302024-08-10T10:46:08+5:30
हार न मानता काही 10 तासांत 4 किलो पेक्षा अधिक वजन कमी करून तो मॅटवर उतरला आणि त्यानं मैदानही मारलं.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. अंतिम लढतीआधी वजन वाढल्यामुळे तिची सुवर्ण पदकाची संधी हुकली. तिला रौप्य पदक मिळणार का? याकडे नजरा लागून राहिल्या असताना युवा पैलवान अमन सेहरावत याने कुस्तीच्या आखड्यातून भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून दिले. विनेश फोगाटप्रमाणेच हा पैलवान देखील गोत्यात आला असता. कारण उंपात्य लढतीतील पराभवानंतर त्याचेही वजन वाढले होते. पण हार न मानता काही तासांत ४ किलो पेक्षा अधिक वजन कमी करून तो मॅटवर उतरला आणि त्यानं मैदानही मारलं.
अन् अमन सेहरावत समोर उभं राहिलं ओव्हरवेटचं चॅलेंज
अमन सेहरावत याने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीतील पराभवानंतर कांस्य पदकावरील दावा भक्कम करणं एक वेगळे आव्हान असते. त्यात अमन समोर ओव्हरवेटचही चॅलेंज होते. उपांत्य फेरीतील पराभवानंतर या भारतीय पैलवानाचे वजन जवळपास 4.6 किलोनं वाढलं होते. कांस्य पदकाच्या लढतीआधी त्याने कमी करून दाखवतं, जगातील मानाच्या स्पर्धेत भारतीय कुस्तीची मान उंचावण्याचे काम केले.
सेमी फायनल लढतीनंतर अमनच्या वजनाचा आकडा पोहचला होता ६१.५ Kg
An Olympic Medal in his first Olympic appearance! Incredible from Aman Sehrawat clinching our 6th medal @paris2024 with a dominating performance today 👏🏽👏🏽#JeetKaJashn | #Cheer4Bharatpic.twitter.com/ASfWvb9lF5
— Team India (@WeAreTeamIndia) August 9, 2024
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी उपांत्य फेरतील लढतीनंतर अमन सेहरावत याचे वजन ६१.५ किलोवर पोहचले होते. तो ५७ किलो वजनी गटात असल्यामुळे नियमानुसार त्याचे वजन ४.५ किलो ग्रॅमपेक्षा अधिक होते. कांस्य पदकासाठीच्या लढतीआधी त्याच्यासमोरही विनेश फोगाटप्रमाणे अपात्रतेची टांगती तलवार होती. भारतीय कोच जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांच्यासमोरही ब्राँझ मेडलसाठीच्या लढतीआधी अमनचं वजन कमी करण्याचे आव्हान उभे राहिले होते.विनेश फोगाटवर ओढावलेले संकट पुन्हा एका पैलवानावर ओढावण्याची भीती निर्माण झाली होती. कारण विनेशला फक्त 100 ग्रॅम वजन अधिक असल्यामुळे अपात्र केले होते. अमनला तर कमी वेळात काही किलोच्या घरात वजन कमी करायचे होते.
वजन घटवण्यासाठी अशी केली कसरत
अमन सेहरावत याची वजन कमी करण्याची कसरत ही दिड तासांच्या मॅट सेशनसह सुरु केली. भारताच्या दोन्ही कुस्ती प्रशिक्षकांनी त्याला प्रेरित केले. मॅटवरील सेशन आटोपल्यावर तासभर गरम पाण्याने आंघोळ केली. त्यानंतर ट्रेडमिलवर व्यायाम करण्यावर त्याने जोर दिला. न थांबता तासभर ट्रेडमिलवर धावण्याची कसरत त्याने केली. जिममध्ये घाम गाळण्याशिवाय सॉना बाथचे 5 मिनिटांचे पाच सेशनसह काही तासांत 4 किलो वजन कमी करण्याच्या प्रवासात अमन सेहरावतनं लिंबू आणि मध टाकून कोमट पाणी आणि कॉफीला पसंती दिली. या सर्व कसरतीसह त्याने मॅच आधी आपलं वजन ५६.९ Kg वर आणले जे त्याच्या वजन गटानुसार १०० ग्रॅमनं कमी होते.