किसमें कितना है दम?

By admin | Published: June 18, 2017 03:22 AM2017-06-18T03:22:23+5:302017-06-18T03:22:23+5:30

फलंदाजी ही भारताची नेहमीच बलाढ्य राहिली आहे. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा हे प्रचंड फार्मात आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकार फलंदाजीस येणारा

How much is that? | किसमें कितना है दम?

किसमें कितना है दम?

Next

फलंदाजी
फलंदाजी ही भारताची नेहमीच बलाढ्य राहिली आहे. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा हे प्रचंड फार्मात आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकार फलंदाजीस येणारा विराट कोहली सध्या टॉप गियरमध्ये आहे. ३00 एकदिवसीय सामन्याचा अनुभव असणारा युवराज सिंग, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, फिनिशर म्हणून ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणारा केदार जाधव, हार्डहिटर हार्दिक पांड्या अशी तगडी स्टारकास्ट भारताकडे आहे.

क्षेत्ररक्षण
युवा संघाचा भरणा असलेल्या भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण सध्या अव्वल दर्जाचे होत आहे. स्वत: कर्णधार कोहली, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, युवराजसिंग, रोहित शर्मा यांच्याकडे चेंडू गेल्यावर प्रतिस्पर्धी फलंदाज धावा चोरण्याचा दहावेळा विचार करतात. यामुळे धावसंख्येवर परिणाम होतो.

जलदगती गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमराह या दोघांच्या खांद्यावर भारतीय जलदगती आक्रमणाची धुरा आहे, आतापर्यंत त्यांनी ती चोखपणे बजावली आहे. इंग्लंडच्या वातावरणात भुवनेश्वर चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करण्यात यशस्वी ठरला आहे. याच्या जोरावर तो सुरवातील बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणत आहे. चेंडू रिव्हर्स स्विंग करुन ‘डेथओव्हर’मध्ये धावा रोखण्यात बुमराह मास्टर होत चालला आहे.

फिरकी गोलंदाज
भारतीय संघात रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हे दोन फिरकी गोलंदाज आहेत. सामन्याच्या मधल्या षटकांत धावा रोखण्याबरोबरच ते बळीही घेत आहेत. याशिवाय केदार जाधव, युवराजसिंग आणि कर्णधार विराट कोहली हे सुध्दा प्रसंगी गोलंदाजी करु शकतात.
डावखुरा इमाद वासिम आणि लेगब्रेक शादाब खान यांच्यासह अनुभवी मोहम्मद हाफिज यांच्यावर पाकिस्तानी फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. पण भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी अतिशय चांगल्या पध्दतीने खेळत असल्याने या तिकडीला जास्त मेहनत करावी लागेल.

फलंदाजी
भारतानंतरच्या पराभवानंतर पाकिस्तानने फकर झमान या नवोदित फलंदाजाला सलामीला संधी दिली आणि तेथून पाकिस्तानी फलंदाजीचे रुप बदलले. अझर अली आणि फकर झमन ही जोडी पाकिस्तानसाठी सध्या लकी ठरत आहे. फकर हा निर्भीडपणे गोलंदाजांवर प्रहार करीत असल्याने अझर अलीचे काम सोपे झाले आहे. अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांच्यासह बाबर आझम, कर्णधार सरफराज अहमद हे दोघे मधल्या फळीला बळकटी आणत आहेत.

क्षेत्ररक्षण्
पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण पाहणे म्हणजे सनी देओलचा डान्स बघणे अशी परिस्थिती होती, परंतु इंग्लंडविरुध्दच्या सेमीफायनलमध्ये त्यांनी कात टाकून नजर लागावी असे क्षेत्ररक्षण केले. त्यांनी अवघड झेल तर घेतलेच शिवाय दोन फलंदाज धावचित करुन विजयाची संधी निर्माण केली.

जलदगती गोलंदाजी
मोहम्मद आमिर हा जागतिक दर्जाचा गोलंदाज हा पाकिस्तानचा हुकमी एक्का आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात त्याने रोहीत शर्माला टाकलेले पहिले षटक त्याच्या प्रतिभेची साक्ष देते. आमिरच्या गैरहजेरीत इंग्लंडविरुध्द पदार्पण केलेल्या रुमान रईसने सर्वांना प्रभावित केले आहे. शिवाय हसन अलीही आपल्या वेगाने भल्याभल्यांची भंबेरी उडवू शकतो.
इंग्लंडच्या ढगाळ वातावरणात पाकिस्तानी गोलंदाजी ही जास्तच भेदक होते.

 

Web Title: How much is that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.