‘हय़ुज’ लॉस!

By admin | Published: November 28, 2014 01:39 AM2014-11-28T01:39:17+5:302014-11-28T01:39:17+5:30

दोन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या हय़ुजने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने क्रिकेटचा ‘हय़ुज’ लॉस झाल्याची प्रतिक्रिया क्रीडाक्षेत्रत उमटत आहे.

'Huez' Los! | ‘हय़ुज’ लॉस!

‘हय़ुज’ लॉस!

Next

 क्रिकेट जगतात शोककळा : दोन दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अपयशी 

सिडनी : क्रिकेटपटू हा जिद्दी असतो.. त्याला आव्हानांशी दोन हात करायला नेहमी आवडते.. यात नेहमीच त्याला विजय मिळेल असे नसले, तरी झुंज देणो हे त्याच्या रक्तात असते.. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप हय़ुजही तसाच होता.. म्हणून चेंडू लागून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यावर कोमात गेलेला हय़ुज ठणठणीत बरा होईल, असे सर्वाना वाटत होते. मात्र, नियतीने या सामन्याचा निकाल आधीच ठरविला होता. दोन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या हय़ुजने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने क्रिकेटचा ‘हय़ुज’ लॉस झाल्याची प्रतिक्रिया क्रीडाक्षेत्रत उमटत आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात त्याची निवड करण्यात आली होती. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या हय़ुजचे येथील सेंट व्हिन्सेंट हॉस्पिटलमध्ये निधन झाले.  ‘मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे, की थोडय़ाचे वेळापूर्वी हय़ुज आपल्याला सोडून गेला,’ अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन संघाचे डॉक्टर पीटर ब्रुकनर यांनी दिली. मंगळवारी झालेल्या दुखापतीनंतर तो शुद्धीत आलाच नाही. मृत्यूपूर्वी त्याच्याशेजारी कुटुंब आणि जवळचे मित्र होते. त्याच्या जाण्याने क्रिकेट क्षेत्रत दु:ख पसरले असून, त्याच्या कुटुंबाचे व मित्र परिवाराचे आम्ही सांत्वन करतो, असे ब्रुकनर म्हणाले. 
 शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज शॉन अबॉटच्या बाउंसरवर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.  63 धावांवर असताना सीन एबोटच्या गोलंदाजीवर हुक मारण्याच्या प्रय}ात चेंडू हय़ुजच्या हेल्मेटवर आदळला. हा प्रहार इतका गंभीर होता, की हय़ुज त्वरित मैदानावर कोसळला. त्याला माऊथ टु माऊट आणि सीपीआर देऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 9क् मिनिटे त्याच्यावर शस्त्रक्रिया चालली आणि त्यानंतर तो कोमात गेल्याचे जाहीर करण्यात आले. हय़ुजच्या मृत्यूनंतर न्यू साऊथ वेल्सचे कार्यकारी प्रमुख अॅण्ड्रय़ू जोन्स म्हणाले, ‘‘उदयोन्मुख आणि अपार क्षमता असलेला तरुण, अशी फिलिपची ओळख होती. त्याच्या चेह:यावर नेहमी स्मित हास्य असे. कारकिर्दीचा आलेख वाढविण्यासाठी तो न्यू साऊथ वेल्समधून सिडनीला स्थायिक झाला. प्रथम o्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 26 शतके आहेत आणि चांगले भविष्य त्याला खुणावत होते. मात्र, आता त्याला हे यश गाठता येणार नसल्याचे दु:ख वाटते.’’
हय़ुजच्या निधनाने सर्वाना धक्काच बसला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेचा प्रत्येक सदस्य हळहळ व्यक्त करीत आहे. ‘आमच्या क्लबमधील तो प्रसिद्ध व्यक्ती होता आणि त्याचा चाहता वर्ग दक्षिण ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियात होता,’ अशी प्रतिक्रिया द.ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेचे कार्यकारी प्रमुख केथ बॅड्रशॉ यांनी दिली. त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ते पुढे सरसावरले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि प्रदीर्घ काळ सहकारी असलेला मायकल क्लार्क हाही हॉस्पिटलमध्ये हय़ुजच्या कुटुंबासोबत होता. तसेच, बॅड्र हॅडिन, स्टीवन स्मिथ, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, नॅथन लिऑन, मोईस हेन्रीकस, डॅनिएल स्मिथ आणि प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनीही हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती. (वृत्तसंस्था)
 
छोटीशी कारकीर्द.. 
25 वर्षीय हय़ुजची कारकीर्द ही अगदी छोटीशीच राहिली. 2क्क्9मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करणा:या हय़ुजने दोन शतके ठोकून दमदार आगमन केले होते. त्याने एकूण 26 कसोटी सामन्यांत 32.65च्या सरासरीने 1,535 धावा केल्या होत्या. त्यात 3 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. जुलै 2क्13मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध अखेरीची कसोटी खेळली. 25 एकदिवसीय लढतींत त्याने प्रतिनिधित्व केले असून, पदार्पणाच्या लढतीत शतक झळकावणारा तो एकमेव ऑसी फलंदाज होता. गेल्या महिन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध अबुधाबी येथे शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तसेच, एका टी-2क् सामन्यात तो खेळला होता. 
 
1998मध्ये भारताचे क्रिकेटपटू रमण लांबा (38व्या वर्षी) चा चेंडू लागून मृत्यू झाला होता. बांगलादेशाविरुद्धच्या लढतीत फलंदाज मेहराब हुसेन याने मारलेला चेंडू  फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे असलेले रमण लांबा यांना लागला आणि ते कोमात गेले. तीन दिवसांनंतर त्यांनी प्राण सोडला. 
1958-59मध्ये पाकचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज (17व्या वर्षी) याला कुएद-ए-आजम चषक स्पध्रेच्या अंतिम लढतीत छातीला चेंडू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यू झाला. 
1961-62मध्ये भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांनाही जीवघेणा अनुभव आला होता. विंडिज दौ:यावर चार्ली ग्रिफीथ यांचा चेंडू कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यावर आदळला. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यानंतर त्यांना क्रिकेट खेळता आले नाही.
2क्12मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 
यष्टिक्षक मार्क बाऊचर यालाही दुखापतीमुळे निवृत्ती घ्यावी लागली.  सॉमरसेट संघाविरुद्ध खेळताना बेल्स बाउचरच्या डोळय़ांवर आदळली होती.
 
निसर्गाची देणगी या खेळाडूला लाभली होती. त्याच्याबरोबर खेळलेल्या, न खेळलेल्या आणि कोणत्याही कारणाने जोडलेल्या प्रत्येकाला ही बातमी उद्ध्वस्त करणारी आहे.- डेव्हिड रिचर्डसन, आयसीसीचे कार्यकारी प्रमुख
 
दुखापत विचित्र होती
फिलिप हय़ुज याला 
झालेली दुखापत विचित्र होती आणि त्यामुळेच त्याला वाचविणो अशक्य झाल्याचे डॉक्टर पीटर ब्रुकनर यांनी सांगितले.  ते म्हणाले, ‘‘हा अपघात अजब होता. त्याच्या मानेला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच त्याच्या मेंदूतून रक्तस्राव होऊ 
लागला. अशा प्रकारची दुखापत अजब असते.  डॉक्टरांच्या भाषेत याला ‘सबारकोनाएड हॅमरेज’ असे म्हणतात. या दुखापतीत रक्तवाहिनी फाटते आणि मेंदूत रक्तस्राव होऊ लागतो.’’
 
हय़ुज प्रतिक्रिया    
फिल हय़ुजच्या 
निधनाबद्दल 
जगभरातील अनेक 
आजी-माजी 
क्रिकेटपटूंनी सहवेदना 
प्रकट केली आहे.
 
सचिन तेंडुलकर : हय़ूजबद्दल कळाल्यानंतर मी स्तब्धच झालो आहे. क्रिकेटसाठी हा दुखद दिवस आहे. त्याचा परिवाराबद्दल मला सहानुभुती आहे.
 
विराट कोहली : ईश्वर फिलच्या आत्म्यास शांती देवो, त्याच्या परिवाराला सावरण्याची शक्ती मिळू दे.
 
रोहित शर्मा : क्रिकेटसाठी 
दु:खमय दिवस आहे, फिलला श्रद्धांजली. या धक्क्यातून सावरण्यासाठी गोलंदाज सीन एबोटलाही ईश्वर शक्ती देवो.
युवराज सिंग : फिल हय़ुज या 
जगात नाही, याच्यावर विश्वास 
बसत नाही, त्याच्या परिवारासाठी माङया सहवेदना.
सुरेश रैना : दु:खी आणि 
स्तब्ध आहे, फिल हय़ुज तू 
आमच्या आठवणीत नेहमी 
राहशील.
डॅरेन लेहमन : आम्ही तुला विसरू शकत नाही, हय़ुज परिवारासाठी प्रार्थना.
ग्लेन मॅकग्रा : त्याच्या कुटुंबासाठी सहवेदना.
 
मॅथ्यू हेडन : फिल हय़ुज, माङया छोटय़ा भावा, ईश्वर तुङया आत्म्यास शांती देवो. भगवान तुला तळहातावर जपेल.
जे. पी. डय़ुमिनी : या वेळी भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सूचत नाहीत.
ग्रॅमी स्मिथ : बातमी ऐकून आतून मी मोडून पडलो आहे.
ए. बी. डिव्हीलियर्स :  खूपच वाईट दिवस, तूझी खूप आठवण येईल फिल.
माहेला जयवर्धने : आत्ताच ही वाईट बातमी ऐकली, फिलचा परिवार आणि त्याच्या मित्रंसाठी माझी सहवेदना.
ािस गेल : तुझी कमतरता जाणवेल.
शाहीद आफ्रिदी : फिल हय़ुजच्या कुटुंबासाठी माझी सहानुभूती आहे.

Web Title: 'Huez' Los!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.