ह्युज शॉक!
By admin | Published: November 28, 2014 02:37 AM2014-11-28T02:37:40+5:302014-11-28T02:37:40+5:30
दोन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या ह्युजने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेटविश्वासाठी हा ‘ह्युज’ शॉक आहे..
Next
सिडनी : क्रिकेटपटू हा जिद्दी असतो.. त्याला आव्हानांशी दोन हात करायला नेहमी आवडते.. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजही तसाच होता.. म्हणून चेंडू लागून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यावर कोमात गेलेला ह्युज ठणठणीत बरा होईल, असे सर्वाना वाटत होते. मात्र, नियतीने या सामन्याचा निकाल आधीच ठरवला होता. दोन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या ह्युजने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेटविश्वासाठी हा ‘ह्युज’ शॉक आहे..
शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज सीन एबोटच्या बाऊंसरवर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
63 धावांवर असताना सीन एबोटच्या गोलंदाजीवर हुक मारण्याच्या प्रय}ात चेंडू ह्युजच्या हेल्मेटवर आदळला; आणि ह्युज मैदानावर कोसळला. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये
नेण्यात आले.
भारतीय फलंदाजांचे अनुभव
भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर आणि संदीप पाटील यांनाही असा जीवघेणा अनुभव आला होता. त्यात दोघेही वाचले; पण कॉन्ट्रॅक्टर यांना कायमचे क्रिकेट सोडावे लागले.
04 डिसेंबरपासून भारताविरुद्ध सुरू होणा:या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात ह्युजची निवड करण्यात आली होती.