शस्त्रक्रियेनंतरही ह्युजची स्थिती नाजूक
By admin | Published: November 26, 2014 01:20 AM2014-11-26T01:20:54+5:302014-11-26T01:20:54+5:30
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजला शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान बाऊंसरवर गंभीर दुखापत झाली.
Next
शेफील्ड शिल्ड सामन्यातील घटना : बाऊंसर डोक्यावर आदळला, दुखापत गंभीर
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजला शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान बाऊंसरवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी सध्या त्याची स्थिती नाजूक आहे.
शेफिल्ड शिल्ड सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज सीन एबोटच्या एका बाऊंसरवर त्याला गंभीर दुखापत झाली. तो मैदानातच कोसळला. त्यानंतर सुरुवातीला एअर अॅम्बुलसच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
25 वर्षीय ह्युजला सेन्ट व्हिन्सेट रुग्णालयात अती दक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या स्थितीबाबत 24 ते 48 तासानंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटलचा प्रवक्ता म्हणाला,‘ह्युजची स्थिती गंभीर असून त्याला आयसीयू’मध्ये ठेवण्यात आलेले आहे.
ह्युजला दुखापत झाल्यानंतर वैद्यकीय स्टाफने त्याला मैदानावर ताबडतोब तोंडाद्वारे प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला. सिडनी मैदानावर जवळजवळ 4क् मिनिटे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला व्हेंटिलेटरच्या आधारावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वृत्तसंस्था)
4कर्णधार मायकल क्लार्क रुग्णालयात पोहचला आणि ह्युजच्या तब्बेतीबाबत माहिती घेतली. त्यावेळी ह्युजची आई आणि बहिण रुग्णालयात होत्या.
4दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे हाय परफॉर्मेन्स संचालक टीम निल्सन यांनी ह्युजच्या कुटुंबीयातर्फे प्रसारमाध्यमांना सांगितले की,‘ह्युजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, याची तुम्हाला कल्पना आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 48 तासानंतर त्याच्या प्रकृतीबाबत काही माहिती देता येईल. ’
4ह्युजच्या दुखापतीचे वृत्त प्रसारमाध्यम व सोशल नेटवर्किग साईटवर वेगाने पसरले. चाहत्यांसह खेळाडूंनी ह्युजच्या प्रकृतीबाबत संदेश दिले.
4नोल्स राज्यातील एक लहान गावात जन्मलेल्या 25 वर्षीय ह्युजने 26 कसोटी व 25 वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, राष्ट्रीय संघात त्याला त्याचे स्थान अद्याप पक्के करता आलेले नाही. ह्युजला आखुड टप्प्याचा मारा खेळताना अडचण भासत होती. त्यामुळे त्यावर टीकाही झाली.कर्णधार क्लार्क दुखापतग्रस्त झाल्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर ह्युजला भारताविरुद्ध 4 डिसेंबरपासून प्रारंभ होणा:या ब्रिसबेन कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले होते.
स्टीव्ह वॉ : 1999 च्या गाले कसोटीत श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराचे नाक फुटले होते. कोलिन मिलरच्या चेंडूवर माहेला जयवर्धने याच्या बॅटला लागून चेंडू हवेत गेला. हा चेंडू टिपण्यासाठी शॉर्ट फाईन लेगवरुन स्टीव्ह वॉ आणि डीप फाईन लेगवरुन जेसन गिलेस्पी दोघेही धावल्याने परस्परांशी त्यांची टक्कर झाली. त्यामुळे वॉ च्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती.
4या घटनेनंतर सामना रद्द करण्यात आला. साधारण विचार करताना वेगवान गोलंदाजांच्या चेंडूचा वेग 14क् किलोमीटर प्रती तास असतो. फलंदाज यापासून बचाव करण्यासाठी बॅटचा वापर करतात, पण एबोटचा चेंडू ह्यूजच्या थेट डोक्यावर आदळला. त्याला स्वत:चा बचावही करता आला नाही.अनेकदा खेळाडूंचा चेहरा व डोके रक्ताने माखलेले असल्याचे दिसून आलेले आहे.
अन् कटू स्मृती
ताज्या झाल्या!
ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटृू फिलिप ह्यूज याला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेट विश्व हादरले . मैदानावर खेळाडूंना जखमा होणो ही नित्याचीच बाब पण शेफिल्ड शील्ड सामन्यादरम्यान एका बाऊन्सरने ह्यूजला गंभीर जखम होणो हे तितिकेच गंभीर! मैदानावर याआधी जे प्रसंग घडले त्यावर हा एक दृष्टीक्षेप..
मार्क बाऊचर : द. आफ्रिकेचा हा यष्टिरक्षक - फलंदाज लेग स्पिनर इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करतेवेळी स्वत:चा डोळा गमावून बसला.
यानंतर बाऊचरचे करियर संपुष्टात आले.
नरी कॉन्ट्रॅक्टर : भारतीय कर्णधार या नात्याने 1962 च्या वेस्ट इंडिज दौ:यात चार्ली ग्रिफिथ याचा बाऊन्सर नरी यांच्या डोक्यावर आदळला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून बरे होण्यास त्यांना दीर्घ काळ लागला. तो या दुखापतीतून तर सावरले पण नंतर कधीही खेळू शकले नाही.
4बाऊंसरमुळे दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाज फिलिप ह्युजच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे घाबरलेले न्यू साऊथ वेल्स व साऊथ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे समुपदेशनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सीन एबोटच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाल्यानंतर ह्युज कोमामध्ये गेला आहे. त्याची स्थिती नाजूक आहे. मैदानावर घडलेल्या या घटनेमुळे उभय संघातील खेळाडू घाबरलेले आहेत. मैदानावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या ह्युजला खेळाडूंनी जवळून बघितले आहे.
4ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अॅलिस्टेयर निकोलसन म्हणाले, ‘फिलबाबतची घटना ऐकल्यानंतर धक्का बसला आहे. त्याच्यावर सवरेत्तम उपचार सुरू आहेत, यावर आम्हाला विश्वास आहे. पण, या घटनेचा त्याचे कुटुंबीय, मित्र आणि मैदानावर त्यावेळी उपस्थित व्यक्तींवर थेट प्रभाव पडला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन सीएच्या साथीने समुपदेशनासाठी प्रयत्नशील आहे. ह्युज या दुखापतीतून लवकरच सावरेल, अशी आम्ही प्रार्थना करतो.’
ब्रायन लारा :2क्क्4 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान हा वेस्ट इंडिजचा आधारस्तंभ,डावखुरा दिग्गज फलंदाज पाकचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या बाऊन्सरवर रक्तबंबाळ झाला होता.
गॅरी कस्र्टन : पाकचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेच आपल्या बाऊन्सरवर द. आफ्रिकेचा फलंदाज गॅरी कस्र्टन याला जखमी केले. कस्र्टनच्या गालाला दुखापत झाली होती.
रिकी पाँटिंग :2क्क्5 च्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याच्या उसळी घेणा:या चेंडूवर हूक मारण्याच्या नादात ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने स्वत:चा गाल दुखापतग्रस्त करुन घेतला.
डेव्हिड लॉरेन्स : 1992 साली झालेल्या वेलिंग्टन कसोटीच्यावेळी इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाच्या पायाचे हाड मोडले. ही दुखापत इतकी गंभीर होती की यानंतर तो कधीही मैदानात परतला नाही.
रमण लांबा : 1998 साली एक क्लबस्तरीय सामना खेळणारा भारतीय फलंदाज रमन लांबा फॉरवर्ड शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करीत होता. फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या डोक्यावर आदळून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या लांबाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला.
भारतीय क्रिकेट संघाच्या फिल हय़ुजेससाठी प्रार्थना
गंभीर जखमी झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हय़ुजेस आणि त्याच्या कुटंबियांना भारतीय संघातील खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभारी कर्णधार विराट कोहलीसह सुरेश रैना, अजिंक्य रहाणो, आर अश्विन आदी खेळाडूंनी फिलला या दुखापतीतून बरे होण्यासाठी ट्टिवटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत आणि प्रार्थनाही केली.
फिलचा अपघात बघून धक्काच बसला. मित्र संघर्ष कर आणि यातून बाहेर ये. माङया शुभेच्छा तुङयासोबत आहेत - आर. अश्विन
प्रार्थना आणि शुभेच्छांच्या बळावर फिल या संकटावर मात करुन बाहेर येईल, सर्वाची शक्ती तुङया कुटुंबासोबत आहे. - विराट कोहली
तु चॅम्पियन आहेस. लवकर बरा हो. आमच्या तुला शुभेच्छा आहेत.- अजिंक्य रहाणो
लवकर बरा हो, ह्युजेस.. शुभेच्छा आणि प्रार्थना. - सुरेश रैना
गेट वेल सून चॅम्प.
- बीसीसीआय
4ह्युज पुढील आठवडय़ात भारताविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या कसोटी सामन्यात कर्णधार मायकल क्लार्कचे स्थान घेण्याची शक्यता होती. ह्युज वैयक्तिक 63 धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज एबोटचा बाऊंसर त्याच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
4मैदानावर मेडिकल स्टाफने त्याच्यावर बराचवेळ उपचार केला, पण ह्युजच्या प्रकृतीमध्ये कुठलीच सुधारणा दिसून न आल्यामुळे एअर अॅम्बुलन्सला पाचारण करण्यात आले. एअर अॅम्बुलन्स मैदानात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.