हैदराबादचा बंगऴुरुवर १५ धावांनी विजय
By admin | Published: May 1, 2016 12:39 AM2016-05-01T00:39:10+5:302016-05-01T00:39:10+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुवर १५ धावांनी विजय मिऴविला.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ०१ - आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुवर १५ धावांनी विजय मिऴविला.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुची सुरुवातीला खराब फलंदाजी झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुने वीस षटकात सहा बाद १७९ धावा केल्या.
शेन वॉटसन अवघ्या एका धावेवर बाद झाला, तर लोकेश राहुल ५२ धावांवर बाद झाला. एबी डीव्हिलियर्स ४७ धावावर झेलबाद झाला. विराट कोहली १४ धावा केल्या.
याआधी सनरायझर्स हैदराबादने २० षटकात पाच बाद १९४ धावा केल्या होत्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५० चेंडूत पाच षटकार आणि नऊ चौकार लगावत ९२ धावा केल्या. त्याला एबी डीव्हिलियर्सने झेलबाद करुन शतक करण्यापासून रोखले. तर, केन विल्यम्सननेही चांगली खेळी केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. केन विल्यम्सनने ३८ चेंडूत ५० धावा कुटल्या. शिखर धवन अवघ्या ११ धावा काढून तंबूत परतला. शिखर धवनला केन रिचर्डसनने झेलबाद केले. नमन ओझा अवघ्या एका धावेवर बाद झाला. दीपक हुडा दोन धावांवर धावचीत झाला. तर,
रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुकडून गोलंदाज केन रिचर्डसनने दोन बळी घेतले, तर तबरेज शम्सी आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.