हैदराबादचा गुजरातवर १० गडी राखून दणदणीत विजय
By admin | Published: April 21, 2016 11:21 PM2016-04-21T23:21:15+5:302016-04-21T23:29:56+5:30
शिस्तबद्ध गोलंदाजी नंतर केलेल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने बलाढ्य गुजरात लायन्सचा १० गड्यांनी दारुण पराभव केला
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २१ - शिस्तबद्ध गोलंदाजी नंतर केलेल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने बलाढ्य गुजरात लायन्सचा १० गड्यांनी दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातला १३५ धावांत रोखले. कुमारने आपल्या ४ षटकात ७.२५ च्या सरासरीने २९ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले.
गुजरातकढून मिळेल्या १३६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादने एकही फलंदाज न गमावता हा विजय संपादन केला. वार्नर आणि शिखर धवने १३६ धावांचे लक्ष ३१ चेंडू राखून मिळवले. वार्नरने ४८ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याने यात ९ चौकार लगावले. शिखर धवनने शिस्तबध्द फलंदाजी करताना ४१ चेंडूत ५ चौकाराच्या मतदीने ५३ धावांचे योगदान दिले. या विजयासह IPLच्या ९ व्या सत्रातील हैदराबादचा हा दुसरा संपादन केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात लायन्सनं सनरायजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 136 धावांचं लक्ष्य ठेवलं होत. गुजरात लायन्सनं 20 षटकांत 8 बाद 135 धावा काढल्यात. यावेळी रैनानं 51 चेंडूंत 9 चौकार मारत 75 धावा काढल्या आहेत. मॅक्युलम आणि कार्तिकनं प्रत्येकी 1 चौकार लगावले आहेत. मॅक्युलम 18, रैना 75, कार्तिक 8, ब्राव्हो 8, जडेजा 14, नाथ 5, स्टेन 1, कुमारनं नाबाद 1 रन काढले आहेत.