आरसीबीपुढे हैदराबादचे आव्हान
By admin | Published: April 25, 2017 01:06 AM2017-04-25T01:06:51+5:302017-04-25T01:06:51+5:30
गेल्या लढतीत ४९ धावांत गारद झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज
बंगळुरू : गेल्या लढतीत ४९ धावांत गारद झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज, मंगळवारी गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
गेल्या लढतीत आयपीएलच्या इतिहासात नीचांकी धावसंख्येवर गारद होणाऱ्या विराट अँड कंपनीसाठी हे आव्हान सोपे नाही. सात सामन्यांत केवळ चार अंकांची कमाई करणारा आरसीबी संघ गुणतालिकेत सर्वांत तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. केदार जाधवने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. भेदक वेगवान माऱ्यापुढे त्याचे तंत्र साधारण ठरले. कोहलीला संघसहकाऱ्यांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.सुमार फलंदाजी, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती. बाद फेरीपूर्वीच आरसीबीला गाशा गुंडाळावा लागणे भारतीय कर्णधाराला पचनी पडणे अवघड आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता सनरायझर्सच्या खात्यावर ८ गुणांची नोंद असून, हा संघ विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील आहे. त्यांनी सलग चार विजय मिळवले होते, पण गेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (वृत्तसंस्था)