हैदराबादने आरसीबीच्या चाहत्यांना केले निराश

By admin | Published: May 31, 2016 03:37 AM2016-05-31T03:37:03+5:302016-05-31T03:37:03+5:30

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर क्रिकेट चाहत्यांचे विशेष प्रेम होते. त्यातील हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित होते

Hyderabad disappointed the fans of RCB | हैदराबादने आरसीबीच्या चाहत्यांना केले निराश

हैदराबादने आरसीबीच्या चाहत्यांना केले निराश

Next

रवी शास्त्री लिहितो़ 
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर क्रिकेट चाहत्यांचे विशेष प्रेम होते. त्यातील हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित होते, तर लाखो चाहते वेगवेगळ्या ठिकाणांवरून संघाच्या विजयासाठी प्रार्थना करीत होते. आरसीबी संघाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. हे चाहते हृदयाने आरसीबीसोबत होतेच आणि संघाच्या विजयासाठी ते करुणाही भाकत होते; पण हैदराबाद संघाच्या चमकदार कामगिरीने आरसीबीच्या चाहत्यांना निराश केले.
विराट कोहलीला यंदाच्या मोसमात रोखणे जवळजवळ अशक्य ठरले. तो सुपरस्टार्सदरम्यान सुपरस्टार ठरला. त्याची फलंदाजीची लय बघता जीवनात कधीकधीच अशी फलंदाजी बघण्याची संधी मिळते, याची प्रचिती आली. सुरुवातीला बेंगलोर संघासाठी त्यांचे गोलंदाज चिंतेचा विषय ठरत होते, तर फलंदाजी सुरुवातीपासून फॉर्मात होती. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात उभय विभागात सांघिक कामगिरी अनुभवाला मिळाली. त्यामुळे संघाने अखेरच्या
आठपैकी सात सामन्यांत विजय मिळवला. अंतिम लढतीतील काही निर्णयावर चर्चा करता येईल. वॉटसनकडून पूर्ण चार षटके गोलंदाजी करण्याऐवजी इक्बाल अब्दुल्लाला गोलंदाजीसाठी पाचारण करता आले असते किंवा सचिन बेबीच्या स्थानी सरफराज अहमदला खेळविता आले असते.
हैदराबाद संघाचे यश आत्मविश्वासाची प्रचिती देणारे आहे. गोलंदाजी या संघाची मुख्य ताकद आहे. त्यामुळे फलंदाजीमध्ये संघात एकमेव वॉर्नर फॉर्मात असला तरी त्याचा विशेष फरक पडला नाही. संघाला सुरुवातीपासून तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची चिंता सतावत होती, तर तळाच्या फलंदाजांकडून उपयुक्त साथ लाभत नव्हती. केवळ आत्मविश्वास उंचावलेला असल्यामुळे संघ चॅम्पियन ठरला. गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जर मुस्तफिजूर आणि भुवनेश्वर फलंदाज असते तर ते कोहलीचे कडवे प्रतिस्पर्धी ठरले असते.
स्पर्धेतील अन्य दोन दावेदार संघांनी ही लढत मैदानाबाहेरून बघितली. मुंबई इंडियन्सला गृहमैदान बदलल्याचा फटका बसला तर कोलकाता नाईट रायडर्स संघ युसूफ पठाणवर गरजेपेक्षा अधिक विसंबून असल्याचे दिसून आले. या दोन संघांपैकी एखादा संघ प्लेआॅफमध्ये स्थान मिळवणार नाही, असे अपवादानेच घडले असते. या स्पर्धेत सर्वंच संघांना समान संधी मिळाली. त्यात गुजरात लायन्स संघाने मोसमाच्या सुरुवातीपासून शानदार खेळ केला, तर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने पूर्वीच्या तुलनेत या वेळी शानदार आगेकूच केली. रायझिंग पुणे सुपरजायंट््स व किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठीही या वेळी काही संस्मरणीय बाबी घडल्या. धोनीने ताठ मानेने यंदाच्या आयपीएलचा निरोप घेतला. मुरली विजयला कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागली आणि त्याने आपली भूमिका चोख बजावली.
यंदाच्या मोसमात २०० पेक्षा अधिक धावसंख्येचे स्कोअर मोजक्याच लढतींत बघायला मिळाले. षटकारही पूर्वीच्या तुलनेत कमी लगावले गेले. जास्तीत जास्त स्कोअर १६०-१७० च्या दरम्यान झाले. त्यामुळे कोहली आणि वॉर्नरच आपल्याला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरल्याचे दिसून येते. (टीसीएम)

Web Title: Hyderabad disappointed the fans of RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.