हैदराबाद प्लेआॅफसाठी तर मुंबई अव्वल स्थानासाठी लढणार

By admin | Published: May 8, 2017 06:04 PM2017-05-08T18:04:29+5:302017-05-08T18:05:04+5:30

पंजाब विरुद्ध गुजरात या सामन्यात गुजरातच्या विजयाचा आनंद रैना पेक्षा हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला कदाचित जास्त झाला

For Hyderabad play-off, Mumbai will be contesting for the top position | हैदराबाद प्लेआॅफसाठी तर मुंबई अव्वल स्थानासाठी लढणार

हैदराबाद प्लेआॅफसाठी तर मुंबई अव्वल स्थानासाठी लढणार

Next

आकाश नेवे/आॅनलाईन लोकमत
पंजाब विरुद्ध गुजरात या सामन्यात गुजरातच्या विजयाचा आनंद रैना पेक्षा हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला कदाचित जास्त झाला असेल. पंजाबने या सामन्यात विजय मिळवला असता तर ते प्ले आॅफसाठी कडवी झुंज देऊ शकले असते. मात्र गुजरातने पंजाबच्या अडचणी वाढवल्या आणि हैदराबादच्या काही प्रमाणात कमी केल्या. हैदराबादला प्ले आॅफसाठी आज मुंबई विरोधात विजय नोंदवणे आवश्यक आहे. तर मुंबई इंडियन्सदेखील प्ले आॅफमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर कायम राहण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे ते देखील आज ८ वाजता हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडिअमवर होणाऱ्या यासामन्यात विजयासाठी कसोशीने प्रयत्न करतील. क्वालिफायरसाठी मुंबईला गुणतक्त्यात पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहणे गरजेचे आहे. मुंबईने प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेला असला तरी त्यांचे लक्ष्य आता क्वालिफायर सामन्यात खेळण्याचे आहे. त्यामुळे मुंबईचा धडाका
हैदराबाद रोखू शकेल का, हा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सने पुणे वगळता इतर कोणत्याही संघासमोर हार मानलेली नाही. मजबूत फलंदाजी, अष्टपैलुु खेळाडूंचा भरणा, आणि गोलंदाज या तिन्ही प्रकारात मुंबई इंडियन्स सरस आहे. जोश बटलर, पार्थिव पटेल, लेंडल सिमन्स हे संघाला उत्तम सुरूवात करून देतात. मधल्या फळीत रोहित शर्मा, नितीश राणा, पोलार्ड हे दमदार कामगिरी करत आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या अखेरच्या षटकांत संघाच्या धावगतीला मोठा वेग मिळवून देतात. तर गोलंदाजीत मिशेल मॅक्लेघन, हरभजन सिंह, कर्ण शर्मा प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत आहेत. मुंबईने या आधीच्या सामन्यात दिल्लीवर विक्रमी १४६ धावांनी विजय मिळवला होता. त्यात हरभजनने ३ आणि कर्ण शर्माने देखील तीन बळी घेतले होते. डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट म्हणून जसप्रीत बुमराह ओळखला जातो. तो अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाला कशी खिळ घालतो हे सर्वांनी
गुजरात विरुद्ध मुंबईच्या सामन्यात पाहिले आहे. सुपर ओव्हरमध्ये त्याने फिंच,मॅक्युलम यांना रोखले होते. हैदराबादचा संघही सरस आहे. डेव्हिड वॉर्नर ५२० धावा करून आॅरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे तर भुवनेश्वर कुमार २१ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आहे. वॉर्नर आणि धवन बाद झाल्यावर मधली फळी झटपट धावा करण्यात अपयशी ठरत आहे. युवराज सिंहने आधीच्या सामन्यात दिल्ली विरोधात ७० तर पुण्याविरोधात ४७ धावा फटकावल्या होत्या. मात्र या दोन्ही सामन्यात सनरायजर्सला पराभव स्विकारावा लागला. पुण्याने तर घरच्या मैदानावर हैदराबादला पराभूत केले होते. मात्र मुंबई विरोधातील हा सामना देखील हैदराबादमध्येच होणार आहे. आणि घरच्या मैदानावर सनरायजर्स नेहमीच वरचढ ठरले आहेत.

Web Title: For Hyderabad play-off, Mumbai will be contesting for the top position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.