हैदराबादचं केकेआरसमोर 163 धावांचं आव्हान
By admin | Published: May 25, 2016 09:39 PM2016-05-25T21:39:45+5:302016-05-25T21:46:43+5:30
आयपीएलच्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादनं केकेआरसमोर 163 धावांची आघाडी उभी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 25- आयपीएलच्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादनं केकेआरसमोर 163 धावांची आघाडी उभी केली आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबादनं चांगली खेळी करत 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावा केल्या आहेत. हैदराबादकडून युवराज सिंगनं चमकदार कामगिरी करत 8 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावांची खेळी केली. तर कॅप्टन वॉर्नर 28, धवन 10, हेनरिक 31, हूडा 21, ओझा 7, कुमार 1 धावा काढून तंबूत परतले आहे. शर्मा आणि सरण अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहिले. शर्मानं नाबाद राहत 14 धावा केल्यात. तर केकेआरकडून भेदक गोलंदाजीच्या जोरावर कुलदीप यादवनं हेनरिक, वॉर्नर आणि कटिंगला तंबूत परत पाठवले. मॉर्केलनं 2 आणि होल्डर दोन बळी मिळवले.
गुणतालिकेत सुरुवातीच्या काळात अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादला गेल्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद एलिमिनेटर लढतीत खेळतो आहे. या लढतीत तो जिंकल्यास त्याचे प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित होणार आहे. केकेआरलाही सनरायझर्स हैदराबादचं आव्हान पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.