हैदराबादचे चोख प्रत्युत्तर
By admin | Published: December 25, 2016 03:19 AM2016-12-25T03:19:28+5:302016-12-25T03:19:28+5:30
मुंबईला २९४ धावांत रोखणाऱ्या हैदराबाद संघाने रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३ बाद १६६ अशी वाटचाल केली. तन्मय अग्रवाल आणि एस. बद्रिनाथ
रायपूर : मुंबईला २९४ धावांत रोखणाऱ्या हैदराबाद संघाने रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३ बाद १६६ अशी वाटचाल केली. तन्मय अग्रवाल आणि एस. बद्रिनाथ यांची अर्धशतके दुसऱ्या दिवसाच्या खेळातील आकर्षण ठरले. हैदराबाद १२८ धावांनी मागे असून त्यांचे सात फलंदाज श्ल्लिक आहेत. खेळ थांबला तेव्हा सलामीवीर तन्मय ६३ आणि भवानाका संदीप १० धावांवर नाबाद होते. तन्मयने २२२ चेंडू टोलविले. संथ खेळीत त्याने सात चौकार ठोकले. कर्णधार एस. बद्रिनाथ अभिषेक नायरच्या चेंडूवर त्रिफळा बाद होण्याआधी त्याने १३७ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावा केल्या.
मुंबईकडून अभिषेक नायरने सकाळी अर्धशतक ठोकले. दुपारी १७ षटके गोलंदाजी करीत त्याने २६ धावांत हैदराबादच्या तिन्ही फलंदाजांना बाद केले. त्याआधी ५ बाद २५० वरून पुढे खेळणाऱ्या मुंबईकडून कालचा शतकवीर सिद्धेश लाड ११० धावा काढून बाद झाला. अभिषेकने १११ चेंडूत नऊ चौकारानसह ५९ धावांचे योगदान दिले. हैदराबादचा चमा मिलिंद याने पाच गडी बाद केले. मोहम्मद सिराजने चार बळी घेतले. (वृत्तसंस्था)