वर्माच्या मागचा सूत्रधार मीच!
By admin | Published: November 25, 2014 01:06 AM2014-11-25T01:06:22+5:302014-11-25T01:06:22+5:30
श्रीनिवासन यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मीच पैसा पुरवीत आहे, असा सनसनाटी खुलासा आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी केला आहे.
Next
मुंबई : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील याचिकाकर्ते आदित्य वर्मा यांना श्रीनिवासन यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मीच पैसा पुरवीत आहे, असा सनसनाटी खुलासा आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने श्रीनिवासन यांना आजच फटकारले होते, त्यापाश्र्वभूमीवर मोदी यांच्या खुलाशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोदी यांनी सांगितले, की श्रीनिवासन आणि अन्य व्यक्तींविरोधात याचिकाकत्र्याना मीच आर्थिक मदत करीत आहे. जे मला मदत करीत आहेत, त्यांना मदत करण्यात काहीच गैर नाही. पडद्याआडून बीसीसीआय सर्वाना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळेच भारतीय क्रिकेटमध्ये पसरलेली कीड साफ होऊ शकते. पैसा आणि सामथ्र्याच्या जोरावर काही लोकांनी बीसीसीआयमध्ये कब्जा केला आहे. ते श्रीनिवासन यांच्या दृष्कृत्यांना पाठीशी घालत आहेत. या बजबजपुरीतून न्यायालयच क्रिकेटला साफ करू शकते. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांचे मालक सट्टेबाजीत अडकले असल्याने या दोन संघांना आयपीएलमधून बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी करून मोदींनी आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांना अटक करण्याचीही मागणी केली. (विशेष प्रतिनिधी)
o्रीनिवासन पळू शकत नाही!
o्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट या कंपनीने चेन्नई सुपर किंग्ज संघ विकत घेतला आहे आणि o्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन याचा बेटिंग प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. 2क्क्8 सालापासून मयप्पन हा चेन्नई संघाचा अधिकारी म्हणून कार्यरत होता. यावर न्यायालय म्हणाले, आयपीएल संघ विकत घेण्यामागे o्रीनिवासन यांचे हितसंबंध गुंतले आहेत.
बीसीसीआयच्या अध्यक्षांना हा खेळ सुरू ठेवायचा होता; परंतु त्यांच्याच संघावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि ते त्यापासून पळू शकत नाही. बीसीसीआयचे वकिलांनी यात कोणत्याची प्रकारची हितसंबंधांची गुंतागुंत नसल्याचा बचाव केला. मुंबई उच्च न्यायालयाने यावरील याचिका फेटाळल्याचे सांगितले.
आज पुन्हा
सुनावणी
o्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा रुजू होण्याकरिता याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. अध्यक्षपदाचा मान पुन्हा o्रीनिवासन यांना मिळणार का, या प्रश्नावर न्यायाधीश म्हणाले, बेटिंग प्रकरणाशी संबंध असलेला मयप्पन हा चेन्नईचा अधिकारी आहे.
त्यामुळे या प्रकरणातील प्रश्नांचा उत्तर देण्यास o्रीनिवासन बांधिल आहेत. तसे न केल्यास त्यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेवर आणि त्या पदावर परिणाम होऊ शकतो. तसेच संशयाचा फायदा एखाद्या व्यक्तीपेक्षा खेळाला मिळायला हवा.
फिक्सिंग प्रकरणात ज्या संघावर आरोप आहेत, त्या संघाच्या मालकाला अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे न्यायालयाने अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले. तसेच, क्लिन चिट मिळाल्याच्या अविर्भावात राहत असल्याचा टोला न्यायाधीशांनी o्रीनिवासन यांना लगावला.
‘सध्या बोलणो योग्य नाही’
नवी दिल्ली : न्यायालयात सुरू असलेल्या फिक्सिंग प्रकरणावर सचिन तेंडुलकर याने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. राज्यसभा सदस्य सचिन म्हणाला, स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर न्यायालयात खटला सुरू आहे आणि त्यावर कोणतेही भाष्य करणो योग्य ठरणार नाही.
2.50स्रे
क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जावा आणि तो योग्य खेळाडू वृत्तीने खेळला जावा. तुम्ही फिक्सिंगला मान्यता देत असाल, तर या खेळाचा गळा घोटत असल्याचे कोर्टाने नमूद केले.
2.55स्रे
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयपीएल संघ मालक अशी दुहेरी भूमिका o्रीनिवासन कसे पार पाडू शकतात, यात त्यांचे हितसंबंध गुंतल्याचा फटकारा न्यायालयाने मारला.
3.05स्रे
दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही बीसीसीआयने न्यायालयासमोर दिली. फिक्सिंग प्रकरणातील दोषींवर केवळ प्रशासकीय कारवाई करणार का, असा सवाल न्यायालयाने बीसीसीआयला केला. त्या वेळी बोर्डाच्या वकिलांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
3.16स्रे
सामन्याचा निकाल आधीच ठरला असेत, तर तो पाहणार कोण, असा सवाल न्यायालयाने केला. या प्रश्नावर न्यायालयाने बीसीसीआयला धारेवर धरले. एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे गुरूनाथ मयप्पन याच्या कृत्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मुद्गल समितीने मय्यपन हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अधिकारी असल्याचे अहवालात मांडले.
3.10स्रे
चेन्नईचा संघ इंडिया सिमेंट कंपनीने विकत घेतला असून, o्रीनिवासन एकटे तो विकत घेऊ शकत नसल्याचा युक्तिवाद बीसीसीआयने न्यायालयात केला. o्रीनिवासन हे इंडिया सिमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि चेन्नई संघ इंडिया सिमेंटची उपकंपनी आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी o्रीनिवासन पुन्हा रुजू होऊ शकतात का, असे बीसीसीआयने विचारले.
3.36स्रे
मुद्गल समितीचा अहवाल जनतेसमोर न आणण्याची विनंती बीसीसीआयने न्यायालयाकडे केली. हा अहवाल जनतेसमोर आल्यास क्रिकेटपटूंची कारकीर्द संपुष्टात येईल.
4.32स्रे
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी ट्विटरवरून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर बंदी घालण्याची मागणी केली.
क्रिकेटपटूंना सट्टेबाजांपासून दूर ठेवण्यासाठी उपाय
नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचारमुक्त विश्वचषक’ असा दावा करणा:या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित आगामी विश्वचषकात क्रिकेटपटूंना सट्टेबाजांपासून दूर ठेवण्यासाठी उपाय शोधला आहे. या दोन्ही देशांतील कायदा अंमलबजावणी एजन्सीसोबत आयसीसीने करार केला.
फिक्सिंगमधील दोषींवर कारवाई होणारच : क्रीडामंत्री
नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग हा गंभीर गुन्हा असून, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळून आलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवाल यांनी म्हटले आह़े केंद्रीय क्रीडामंत्री पुढे म्हणाले, की आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जे कोणी दोषी आढळून येईल़ त्यांना शिक्षा होणारच़