मी "तसं" म्हणालोच नाही, मांजरेकरांचं पोलार्डला उत्तर

By admin | Published: April 16, 2017 08:45 AM2017-04-16T08:45:21+5:302017-04-16T08:45:21+5:30

माजी भारतीय कर्णधार आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी केरन पोलार्डबाबत समालोचन करताना केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

I did not say "this", the answer to Manjrekar's Pollard | मी "तसं" म्हणालोच नाही, मांजरेकरांचं पोलार्डला उत्तर

मी "तसं" म्हणालोच नाही, मांजरेकरांचं पोलार्डला उत्तर

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - माजी भारतीय कर्णधार आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी केरन पोलार्डबाबत समालोचन करताना केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीही पोलार्डला अक्कलशून्य म्हणालो नाही असं ते म्हणाले. अक्कलशून्य किंवा डोकं नाही असे शब्द मी वापरत नाही, मी टीकाकार आहे पण कोणाचा अपमान करू शकत नाही. पोलार्ड प्रकरणावरून माझ्यावर टीका करणा-यांनी व्हिडीओ फूटेज पाहावे असं ट्वीट मांजरेकरांनी केलं आहे.  
 
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचक संजय मांजरेकर विरूद्ध किरोन पोलार्ड असा हा वाद आहे. पोलार्ड एका मोक्याच्या क्षणी बाद झाला, तेव्हा समालोचनादरम्यान, मांजरेकर यांनी पोलार्डबद्धल काही टिप्पणी केली. यावर पोलार्ड चांगलाच संतापला. त्याने मांजरेकरांच्या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सुरू होता. सामन्यादरम्यान, पोलार्ड १७ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला. या वेळी मुंबई इंडियन्सची स्थिती ५ बाद ११९ अशी होती. मुंबईसमोर हैदराबादचे १७९ धावांचे लक्ष्य होते आणि केवळ चार ओव्हरच (षटके) शिल्लक होत्या. दरम्यान, मांजरेकर समालोचन करत होते. ऐन वेळी पोलार्ड बाद झाला हे पाहून, मांजरेकरांनी पोलार्डवर टीका केली. सहकारी समालोचकाने मांजरेकर यांना पोलर्डसाठी फलंदाजीचे आदर्श स्थान कोणते, असा प्रश्न केला. त्यावर पोलार्ड डावाच्या शेवटी सहा किंवा सात षटकांत फलंदाजी करण्यासाठी योग्य असल्याचे मत मांजरेकरांनी व्यक्त केले.
मांजरेकरांच्या मतावर प्रतिक्रीया देताना आपल्या ट्विटमध्ये पोलार्ड म्हणतो, बोलण्यासाठी पैसा मिळतो म्हणून मांजरेकर तुम्ही काहीही बरळण्यास मोकळे आहात का? तुम्ही भो-भो करणे सुरू ठेवू शकता. मला इतका पैसा का मिळतो, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मी इतका पैसा मिळविण्याचा हकदार आहे, अशा शब्दांत मांजरेकरांना प्रतिक्रीया देतानाच शब्दात मोठी ताकद असते. एकदा शब्द बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. शब्द जरा जपून वापरा, असा सल्लाही पोलार्डने मांजरेकरांना दिला होता.
 
 

Web Title: I did not say "this", the answer to Manjrekar's Pollard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.