माझ्यावर कोणताही दबाव नसून जबाबदारी आहे- विजेंदर सिंग

By admin | Published: July 13, 2016 08:51 PM2016-07-13T20:51:16+5:302016-07-13T20:51:16+5:30

आॅस्ट्रेलियाचा बॉक्सर केरी होपविरुध्द होणाऱ्या आगामी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदासाठी माझ्यावर कोणतेही अतिरिक्त दबाव नाही.

I have no obligation but responsibility - Vijender Singh | माझ्यावर कोणताही दबाव नसून जबाबदारी आहे- विजेंदर सिंग

माझ्यावर कोणताही दबाव नसून जबाबदारी आहे- विजेंदर सिंग

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - आॅस्ट्रेलियाचा बॉक्सर केरी होपविरुध्द होणाऱ्या आगामी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदासाठी माझ्यावर कोणतेही अतिरिक्त दबाव नाही. मात्र देशात बॉक्सिंगच्या प्रसारासाठी माझ्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव मला आहे, असे वक्तव्य भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग याने केले.
मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान विजेंदर बोलत होता. विजेंदरने घरच्या मैदानावर होणाऱ्या आपल्या पहिल्या व्यावसायिक बाउटपुर्वी सांगितले की, ह्यह्यमाझ्यामत्र या लढतीबाबत माझ्यावर कोणतेही दबाव नसून माझ्यावर अधिक जबाबदारी असल्याची जाणीव आहे. कारण या फाइटवरुन भारतातील व्यावसायिक बॉक्सिंगचे भविष्य कसे आहे ते ठरेल.ह्णह्ण
ह्यह्यया फाइटसाठी लोकांमध्ये खूप उत्साह असून या लढतीसाठी ते मोठ्या संख्येने येतील. नक्कीच मला यासाठी माझा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. माझ्यावर कोणतेही दबाव नसून केवळ जबाबदारी आहे आणि ती मी पुर्ण करणार. या लढतीसह मी विजेतेपदावर कब्जा करेल,ह्णह्ण असेही विजेंदरने यावेळी सांगितले.
विजेंदरने याआधी आपल्या पहिल्या सहा व्यावसायिक लढती नॉकआऊटमध्ये जिंकल्या आहेत. भारतात होणाऱ्या लढतीत विजेंदरचा प्रतिस्पर्धी आॅस्टे्रलियाचा केरी होप त्याच्यातुलनेत खूप अनुभवी असून होपला ३० बाउट खेळण्याचा अनुभव आहे. होपने आपल्या ३० बाउटपैकी २३ जिंकल्या असून त्यातील २ नॉकआऊट आहेत.
............................................

होप डावखुरा बॉक्सर असून मी त्याला चांगला ओळखतो. तो खूप अनुभवीही आहे. बाउटच्याआधी मला काहीच बोलायचे नसून, कोणतीही टिप्पणीही करायची नाही.
- विजेंदर सिंग

Web Title: I have no obligation but responsibility - Vijender Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.