मी नैसर्गिक खेळ केला : रवींद्र जडेजा
By admin | Published: July 24, 2014 01:15 AM2014-07-24T01:15:59+5:302014-07-24T01:15:59+5:30
लॉर्डसवर 1983 साली विश्वचषक उचलणारा कपिल देव, आणि नॅटवेस्ट मालिका जिंकल्यानंतर जर्सी काढून गरागरा फिरवणारा सौरभ गांगुली प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत,
Next
लॉर्डसवर 1983 साली विश्वचषक उचलणारा कपिल देव, आणि नॅटवेस्ट मालिका जिंकल्यानंतर जर्सी काढून गरागरा फिरवणारा सौरभ गांगुली प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत, परंतु आता त्याच्या जोडीला रविंद्र जडेजाने अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटची जी तलवारबाजी केली तेही कायमस्वरुपी लक्षात राहील.
इंग्लंडविरुध्दच्या दुस:या कसोटीच्या चौथ्या दिवशी रविंद्र जडेजाने अर्धतकी खेळी करुन भारताला पुरेसी आघाडी
मिळवून दिली. अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्याने आपल्या हातातील बॅट तलवारीसारखी गरागरा फिरवली. त्याचे हे सेलिब्रेशन वेगळे असले तरी त्यामागे अर्थ दडला होता, जो बाल्कनीत बसलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तत्काळ ओळखला, आणि तोही हसू लागला.
त्या प्रसंगाबद्दल बोलताना जडेजा म्हणाला, ‘‘सणासुदीला किंवा खास प्रसंगी आमच्या राजपूत समाजात तलवारबाजीचे सामने होतात. त्यावेळी आमच्या दोन्ही हातात तलवार असते. पण मैदानात माङया केवळ एका हातात बॅट होती, म्हणून मी ती तलवारीसारखी फिरवली.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मला माझा नैसर्गिक खेळ करण्याची परवानगी दिली होती, म्हणून मी फटकेबाजी करु शकलो. केवळ 42 चेंडूत अर्धशतक केले होते. माझी बॅट मी तलवारीसारखी वापरली होती. म्हणून मी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक केले. धोनीने ते पाहिले आणि मला काय म्हणायचे आहे हे त्याच्या लक्षात आले. ’’
जडेजा आणि अँडरसन यांच्यातील वादाच्या पाश्र्वभूमीवर लॉर्डस कसोटी झाल्यामुळे दोन्ही संघादरम्यानचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे दोघांनीही जिद्दीने खेळ केला. जडेजाने अँडरसनला धावचित करुन हा विजय साकारला हा आणखी योगायोग म्हणावा लागेल.
जडेजाने स्वत:ला
सिद्ध केले : धोनी
सामन्यापूर्वी जडेजा प्रचंड दबावात होता असे कबुल करुन कर्णधार धोनी म्हणाला, तो एक प्रतिभासंपन्न खेळाडू आहे. एकदा त्याला त्याचा नैसíगक खेळ करण्यास सांगितले की, तो आपली पात्रता सिध्द करतो. तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो तेथे जलदगतीने धावा करणो गरजेचे असते. तळाच्या फळीतील फलंदाज शक्यतो विकेटवर टिकून राहण्याच्या प्रयत्नात धावा करीत नाहीत. जडेजा फटकेबाजी करु लागला की, त्याच्या धावा होतात असे आपण पाहीले असल्याचे धोनीने सांगितले.