IAAF World Race Walking Cup: सात वर्षांनी भारताचे नशीब फळफळले; कांस्यपदकावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 08:59 PM2019-08-02T20:59:07+5:302019-08-02T21:00:38+5:30
भारताच्या या संघात के टी इरफान, बाबुभाई पनूचा आणि सुरिंदर सिंग यांचा समावेश आहे.
सात वर्षानंतर भारताला जागतिक २० किमी चालण्याच्या शर्यतीचे कांस्यपदक मिळाले. २०१२ मध्ये रशियात पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पण, रौप्यपदक पटकावणारा यूक्रेनचा संघ उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानं त्यांच्याकडून पदक काढून घेण्यात आले. त्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्या स्थानावर वढती मिळाली. म्हणजेच त्यांना कांस्यपदक मिळाले.
भारताच्या या संघात के टी इरफान, बाबुभाई पनूचा आणि सुरिंदर सिंग यांचा समावेश आहे. या स्पर्धेत चीनने सुवर्णपदक जिंकले होते. यूक्रेन बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला रौप्यपदक मिळाले आहे.
📣 News Alert- #TeamIndia-Athletics Men's 20km Race Walking Team is elevated to Bronze Medal position after 7 years at IAAF Race Walking World Cup held at Saransk #Russia in 2012.#IndianAthleticspic.twitter.com/8cwiq5Y2NX
— Athletics Federation of India (@afiindia) August 2, 2019