नोएडाच्या स्टेडियमला आयसीसीकडून मान्यता
By Admin | Published: December 25, 2016 03:16 AM2016-12-25T03:16:57+5:302016-12-25T03:16:57+5:30
आयसीसीने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मान्यता दिली असल्याचा दुजोरा भारतीय क्रिकेट
नवी दिल्ली : आयसीसीने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मान्यता दिली असल्याचा दुजोरा भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी दिला.
बीसीसीआयने म्हटले, ‘आयसीसीने सर्वात आधी डिसेंबर २0१५ मध्ये स्टेडियमची पाहणी केली होती आणि त्यावेळी फक्त असोसिएट सदस्यांच्या सामन्यांचे आयोजनास मान्यता मिळाली होती. या स्टेडियममध्ये अतिरिक्त सुविधा दिली गेली. ज्यामुळे पूर्ण सदस्यांचे सामने येथे खेळले जाऊ शकतील. गेल्या आठवड्यात आयसीसीने स्थळाचे निरीक्षण केले पूर्ण सदस्यांच्या सामन्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण झाल्या. नतीजतन, ग्रेटर नोएडाचे एस.व्ही.एस.पी. क्रिकेट स्टेडियमला पूर्ण सदस्यीय संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची स्वीकृती मिळाली आहे.’
आयसीसीने दिलेल्या मान्यतेविषयी आनंद व्यक्त करताना बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, ग्रेटर नोएडा येथील एसपीएसपी क्रिकेट स्टेडियम पूर्ण सदस्यांच्या आंतराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी पात्र असल्याची घोषणा करताना मला आनंद वाटतोय. बीसीसीआय २३ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर २0१६ दरम्यान दिवस-रात्र स्वरूपात गुलाबी चेंडूवर दुलीप करंडक सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे पायाभूत सोयी आणि सुविधांची चाचणी करता आली.’
ते म्हणाले, ‘अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या देशांतर्गत समान्यांसाठी या स्थळाचा उपयोग केला. मान्यता अधिकाऱ्यांना स्टेडियमला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी प्रेरित करील, असा मला विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)