ICC Champions Trophy 2017 - विजयासाठी इंग्लंडसमोर 278 धावांचे आव्हान
By admin | Published: June 10, 2017 07:42 PM2017-06-10T19:42:37+5:302017-06-10T19:42:37+5:30
आरोन फिंच व स्टीव्हन स्मिथ यांची अर्धशतके आणि अखेरच्या षटकांमध्ये ट्रेव्हिस हेडने फटकावलेल्या 71 धावा यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 278 धावांचे आव्हान ठेवले.
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 10 - "करो वा मरो" अशी स्थिती असलेल्या लढतीत आरोन फिंच व स्टीव्हन स्मिथ यांची अर्धशतके आणि अखेरच्या षटकांमध्ये ट्रेव्हिस हेडने फटकावलेल्या 71 धावा यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 278 धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर डेव्हिड वॉर्नरच्या (21) रूपात ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. पण फिंच (68) आणि स्मिथ (56) यांनी 96 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाची पायाभरणी केली.
मात्र फिंच आणि स्मिथ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. पण ट्रेव्हिस हेडने (नाबाद 71) एक बाजू लावून धरत संघाला 50 षटकात 9 बाद 277 धावांपर्यंत मजल मारून दिली.इंग्लंडकडून मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी चार बळी टिपले.
आणखी बातम्या