ICC Champions Trophy : न्यूझीलंडचे ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे आव्हान
By admin | Published: June 2, 2017 08:33 PM2017-06-02T20:33:41+5:302017-06-02T20:48:08+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने 45 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 291धावांची खेळी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 02 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने 45 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 291धावांची खेळी केली.
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन शानदार शतकी खेली केली. त्याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावत 97 चेंडूत 100 धावा केल्या. त्याला मोझेस हेन्रिक्सने धावबाद केले. तर, ल्युक राँचीने तीन षटकार आणि नऊ चौकारांची तुफान फटकेबाजी करत 43 चेंडूत 65 धावा कुटल्या. मार्टिन गुप्टीलने 26, रॉस टेलर 46, नील ब्रूम 14, जेम्स नीशाम 6, कोरे अँडरसन 8 आणि अॅडम मिल्ने याने 11 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज जोश हेजलवूडने सर्वाधिक जास्त बळी टिपले. त्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना लवकर तबूंत पाठवत 6 बळी घेतले. तर, जॉन हेस्टिंग्सने दोन आणि पॅट कमिन्स एक बळी घेतला.
दरम्यान, उभय संघांत प्रेरणादायी कर्णधार आहेत. ऑस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथवर, तर न्यूझीलंड संघ केन विलियम्सनवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. दोन्ही संघांत एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे; पण वेगवान गोलंदाजीबाबत चर्चा करता ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे वरचढ भासत आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली. मात्र, या सामन्यात केन विलियम्सन आणि ल्युक राँची वगळता कोणालाही म्हणावी तशी कामगिकी करता आली नाही. तर, ऑस्ट्रेलियाला जॉन हेस्टिंग्सच्या रूपाने आणखी एक उपयुक्त वेगवान गोलंदाज मिळाला. पण, या आजच्या सामन्यात त्याला दोनच बळी टिपला आले. जोश हेजलवूडने चांगली कामगिरी करत सर्वाधिक जास्त सहा बळी टिपले.