आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला गृहीत धरणे नडले

By admin | Published: June 9, 2017 03:43 PM2017-06-09T15:43:52+5:302017-06-09T15:43:52+5:30

440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर

ICC Champions Trophy: Sri Lanka take on | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला गृहीत धरणे नडले

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला गृहीत धरणे नडले

Next
>- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर थेट 18 तारखेच्या अंतिम लढतीच्या स्वप्नात हरवलेला भारतीय संघ आणि त्याच्या पाठिराख्यांना मॅथ्युज आणि टीमने जबरदस्त शॉक दिला. त्याची तीव्रता एवढी होती की ओव्हलपासून थेट भारतात घरात बसून सामना पाहत असलेल्या प्रत्येकालाच काही काळ बधीर झाल्यासारखे वाटले.
खरंतर परंपरेप्रमाणे पाकिस्तानला चोपल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध आपला विजय आपण गृहीत धरला. पण हीच बाब आपल्याला नडली. श्रीलंकेचा संघ बऱ्यापैकी नवखा असला तरी तो दुबळा नाही, याचे भान ठेवले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. श्रीलंकेसाठी किती धावा पुरेशा ठरतील, याबाबतही भारतीय संघव्यवस्थापन गोंळल्यासारखे वाटले. रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलग दुसऱ्या सामन्यातील दमदार सलामी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर आपण तीनशे पार मजल मारली. पण धावफलकावर सव्वातीनशेच्या आसपास धावा लागल्यावर भारतीय संघ काहीसा निश्चिंत झाला. श्रीलंका या आव्हानाच्या आसपासही पोहोचू शकत नाही, असा त्यांचा समज झाला.
श्रीलंकन फलंदाजीचा एकंदरीत वकूब पाहता त्यात काही गैर नव्हते. पण मैदानात घडले ते भलतेच. कडकडीत ऊन पडल्याने खेळपट्टीकडून मदत मिळेनाशी झाली. चेंडू सरळ  बॅटवर येऊ लागल्याने भारताचा मध्यमगती मारा निष्प्रभ ठरला. तर फिरकीची मदार असलेल्या सर जडेजानेही हात टेकले.
अशा अनुकूल परिस्थितीत श्रीलंकेच्या गुणतिलका, मेंडिस, परेरा, गुणरत्ने आदी रत्नांनी भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा उघड करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे विकेट घेणे दुरची बात साध्या धावा रोखणेही आपल्याला शक्य झाले नाही. अखेर कुठल्याशा बनियनच्या जाहिरातीत सैफ अली खान धावण्याची शर्यत "बडे आरामसे" पूर्ण करतो, तसे श्रीलंकन संघाने 322 धावांचे लक्ष्य अगदी आरामात गाठले.
आता ब गटात चारही संघांचे प्रत्येकी दोन गुण झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या गटातील पुढच्या दोन लढती जो जिता वही सिकंदर ठरणार आहेत. त्यात रविवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

Web Title: ICC Champions Trophy: Sri Lanka take on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.