आयसीसी नियमांत बदलांची गरज

By admin | Published: August 8, 2014 01:02 AM2014-08-08T01:02:35+5:302014-08-08T01:02:35+5:30

(आयसीसी) आचारसंहितेच्या नियमांत पूर्णपणो बदल करण्याची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी व्यक्त केले आह़े

ICC regulations require changes | आयसीसी नियमांत बदलांची गरज

आयसीसी नियमांत बदलांची गरज

Next
>मुंबई : जेम्स अँडरसनच्या प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेच्या नियमांत पूर्णपणो बदल करण्याची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी व्यक्त केले आह़े 
रवींद्र जडेजाविरुद्ध झालेल्या वादानंतर आयसीसीने नियुक्त केलेले न्यायिक आयुक्त गोर्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करायला आयसीसीने इन्कार केला होता़ आयसीसीने घेतलेल्या या भूमिकेवर पटेल यांनी आपली नाराजी व्यक्त केली़ 
ते म्हणाले, बीसीसीआयने पत्र लिहून आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांना या प्रकरणी अपील करण्याची विनंती केली होती़ मात्र, हे अपील आयसीसीने धुडकावून लावल़े यामुळे आमची निराशा झाली़ त्यामुळे आता आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमांत बदल करण्याची वेळ आली आह़े सध्याच्या नियमानुसार बीसीसीआय लुईस यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकत नाही़ कारण, याचा अधिकार केवळ आयसीसीला आह़े ही खेदजनक बाब आहे, असेही ते म्हणाल़े
इंग्लंड दौ:यावर असलेल्या भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यात झालेल्या धक्कबुक्की प्रकरणात न्यायिक आयुक्त लुईस यांनी दोन्ही खेळाडूंची निदरेष मुक्तता केली होती़ (वृत्तसंस्था)
 
बीसीसीआयमधील अधिकारी आणि वकिलांना आयसीसीच्या नियमांची समीक्षा करण्यास सांगितले आह़े जेणोकरून यासाठी दुसरा पर्याय आहे का? किंवा यात काही बदल करता येणो शक्य आहे का? याचा अभ्यास केला जाणार आह़े जर यात दुसरा काही पर्याय उपलब्ध असेल, तर आयसीसीला पत्र लिहून या नियमांत बदल करण्याची आम्ही मागणी करू़- संजय पटेल 

Web Title: ICC regulations require changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.