आयसीसी टी-२० भारत चौथ्या स्थानी
By admin | Published: May 3, 2017 12:31 AM2017-05-03T00:31:49+5:302017-05-03T00:31:49+5:30
भारताची आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय टीम रँकिंगमध्ये दोन स्थानाने घसरण झाली आहे. भारत चौथ्या स्थानी आहे. भारताला
दुबई : भारताची आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय टीम रँकिंगमध्ये दोन स्थानाने घसरण झाली आहे. भारत चौथ्या स्थानी आहे. भारताला ६ मानांकन गुणांचे नुकसान झाले असून, आता भारताच्या खात्यावर ११८ गुणांची नोंद आहे. दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर असलेल्या अनुक्रमे इंग्लंड व पाकिस्तान या संघांच्या तुलनेत भारत तीन गुणांनी मागे आहे. इंग्लंड व पाकिस्तानच्या खात्यावर प्रत्येकी १२१ मानांकन गुणांची नोंद आहे, पण दशांश गुणांच्या फरकाने पाक पिछाडीवर आहे.
इंग्लंडला ७ मानांकन गुणांचा लाभ झाला असून, हा संघ तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या तुलनेत इंग्लंड चार मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडच्या खात्यावर १२५ मानांकन गुणांची नोंद आहे. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिकेची दोन स्थानाने घसरण झाली असून, हा संघ पाचव्या स्थानी आहे. त्यांना सहा मानांकन गुणांचे नुकसान सोसावे लागले आहे. आॅस्ट्रेलिया त्यांच्यापेक्षा एका गुणाने पिछाडीवर आहे.