ICC Women World Cup 2017: पाकिस्तानसमोर विजयासाठी 170 धावांचं लक्ष्य

By admin | Published: July 2, 2017 06:56 PM2017-07-02T18:56:21+5:302017-07-02T18:56:21+5:30

आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या लढतीत भारतीय महिलांनी सर्व गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 50 षटकांत 169 धावा केल्या आहेत.

ICC Women's World Cup 2017: The target of 170 runs for a win against Pakistan | ICC Women World Cup 2017: पाकिस्तानसमोर विजयासाठी 170 धावांचं लक्ष्य

ICC Women World Cup 2017: पाकिस्तानसमोर विजयासाठी 170 धावांचं लक्ष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 2 - आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या लढतीत भारतीय महिलांनी सर्व गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 50 षटकांत 169 धावा केल्या आहेत. भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 170 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पहिल्या दोन सामन्यांवर कब्जा मिळवलेला भारतीय महिलांचा संघ या सामन्यात काहीसा ढेपाळला आहे.

भारतीय महिला संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या नशरा संधू आणि सादिया युसूफ यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय महिला फलंदाजांनी गुडघे टेकल्याचं पाहायला मिळतं आहे.  पहिल्या दोन सामन्यांवर वर्चस्व गाजवणा-या भारतीय महिलांनी पाकिस्तानच्या आक्रमणासमोर अक्षरशः नांगी टाकली आहेत.

स्मृती मंधाना, मिताली राज, हरमनप्रीत कौर यांनी लागोपाठ बळी दिल्यानं भारतीय महिला संघाला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. भारताकडून पूनम राऊतने 47 धावांची खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानच्या नशरा संधूच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. 

Web Title: ICC Women's World Cup 2017: The target of 170 runs for a win against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.