आयसीसीची नव्या वन-डे लीगची योजना

By admin | Published: June 20, 2016 03:15 AM2016-06-20T03:15:42+5:302016-06-20T03:15:42+5:30

वन-डे क्रिकेटकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये काही बदल करण्याची तयारी केली आहे

ICC's new one-day league plan | आयसीसीची नव्या वन-डे लीगची योजना

आयसीसीची नव्या वन-डे लीगची योजना

Next

दुबई : वन-डे क्रिकेटकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये काही बदल करण्याची तयारी केली आहे. आयसीसीने जगातील १३ संघांच्या साथीने नव्या लीगचे आयोजन करण्याची योजना आखली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी जगातील अव्वल १३ संघांच्या साथीने वन-डे लीगच्या आयोजनाची योजना आखत आहे. २०१९ पासून या नव्या लीगचा वन-डे क्रिकेटमध्ये प्रयोग होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमानुसार वन-डेतील १३ संघ आपसांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळतील. कुठलाही संघ मायदेशात किंवा बाहेर खेळू शकतो. या लीगमध्ये १० कसोटी संघ आणि अफगाणिस्तान, आयर्लंड व एका असोसिएट संघाला सहभागाची संधी मिळू शकते. त्यामुळे वन-डे क्रिकेटला नवी ओळख व नवे प्रेक्षक लाभण्याची आशा आहे.
टी-२० क्रिकेटकडे चाहत्यांचा ओढा बघता वन-डे क्रिकेटचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. आयसीसीच्या योजनेनुसार तीन वर्षांच्या या वन-डे क्रिकेट लीगमध्ये प्रत्येक संघ ३६ सामने खेळेल आणि या ३६ सामन्यांनंतर अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम लढत खेळली जाईल.

Web Title: ICC's new one-day league plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.