भारत-आॅस्ट्रेलिया वादावर आयसीसीच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते :ड्युप्लेसिस

By admin | Published: March 12, 2017 07:51 PM2017-03-12T19:51:33+5:302017-03-12T19:51:33+5:30

भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएसच्या मुद्यावर झालेल्या वादामध्ये आयसीसीने कुणालाच दंड ठोठावला नाही याबाबत आश्चर्य वाटतं

The ICC's role in the India-Australia debate is surprising: Duplessis | भारत-आॅस्ट्रेलिया वादावर आयसीसीच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते :ड्युप्लेसिस

भारत-आॅस्ट्रेलिया वादावर आयसीसीच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते :ड्युप्लेसिस

Next
>ऑनलाइन लोकमत
ड्युनेडिन, दि. 12 - भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएसच्या मुद्यावर झालेल्या वादामध्ये आयसीसीने कुणालाच दंड ठोठावला नाही याबाबत आश्चर्य वाटतं अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस याने दिली. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्यादरम्यान रविवारी संपलेल्या कसोटी सामन्यानंतर ड्युप्लेसिसने ही प्रतिक्रिया दिली.
ड्युप्लेसिसवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान मिंट चघळल्यानंतर चेंडूला लाळ लावल्यामुळे सामना शुल्काचा दंड ठोठावण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी या ड्यूप्लेसिसवर चेंडू खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला होता.
 
पण आयसीसीने भारत आणि आॅस्ट्रेलियाचे कर्णधार विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. आॅस्ट्रेलियामध्ये माझ्याकडून जे काही घडले ते या तुलनेत विशेष महत्त्वाची बाब नव्हती. त्यामुळे भारत-आॅस्ट्रेलिया कसोटीदरम्यान घडलेले प्रकरण मोठे असताना आयसीसीची भूमिका आश्चर्ययचकित करणारी होती, आयसीसीने कुणालाच दंड ठोठावला नाही याचे मला आश्चर्य वाटले असं तो म्हणाला. 
 

Web Title: The ICC's role in the India-Australia debate is surprising: Duplessis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.