बॉक्सिंग इंडिया किंवा आयएबीएफला मान्यता देण्याचा आयओएचा विचार
By admin | Published: January 26, 2016 02:40 AM2016-01-26T02:40:01+5:302016-01-26T02:40:01+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करताना भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडिया किंवा भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करताना भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडिया किंवा भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ (आयएबीएफ) यांच्यापैकी कुणा एका संघटनेला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यासाठी राज्य संघटनांकडून उत्तर मागितले आहे. या दोन्ही संघटनांची मान्यता जागतिक महासंघाने (एआयबीए) रद्द केलेली आहे.
उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने ११ नोव्हेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेशामध्ये आयओएला याबाबत ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले आहे. न्यायालयाने त्यासोबत बॉक्सिंग इंडियाला २७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत मान्यतेसाठी आयओएकडे अर्ज सादर करण्यास सांगितले होते, तर आयएबीएफला देशातील सर्वोच्च संस्थेकडून यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे.
आयओएने आता राज्य आॅलिम्पिक संघटनांना बॉक्सिंग इंडिया आणि आयएबीएफ यांच्यापैकी कुठली संघटना बॉक्सिंगच्या विकासासाठी चांगले कार्य करीत आहे याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)