वर्ल्डकप खेळणार नसेल तर धोनीचा निर्णय योग्य - राहुल द्रविड
By admin | Published: January 6, 2017 01:18 PM2017-01-06T13:18:24+5:302017-01-06T13:21:45+5:30
कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा धोनीचा निर्णय आश्चर्यकारक नव्हता असे राहुल द्रविडने म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - दोन वर्षांनी होणा-या 2019 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये धोनी खेळणार नसेल तर, त्याचा कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय योग्य आहे असे मत भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.
कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा धोनीचा निर्णय आश्चर्यकारक नव्हता असे राहुल द्रविडने म्हटले आहे. पुढच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये धोनी कर्णधार म्हणून स्वत:ला पाहत नसेल तर त्याचा निर्णय योग्य आहे. विराट कोहलीसाठी ही चांगली वेळ असून, त्यालाही विश्वचषकासाठी मनासारखी संघबांधणी करता येईल असे द्रविडने म्हटले आहे.
धोनीचा अनुभव, क्षमता याला अजिबात तोड नाही. दबावाखाली खेळण्याची धोनीची जी क्षमता आहे अशा प्रकारचे खेळाडू सहजासहजी मिळत नाहीत असे द्रविडने सांगितले. धोनी भारतीय वनडे संघासाठी अमूल्य खेळाडू आहे. पण कामगिरीच्या बळावरच तुम्हाला संघात तुमचे स्थान पक्के करता येते असे द्रविडने सांगितले.