मी कोणालाही घाबरत नाही, गोल्डन गर्ल हिमाचा लढवय्या बाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 08:08 AM2018-08-26T08:08:06+5:302018-08-26T08:10:56+5:30
हिमा दास, भारताची नवी गोल्डन गर्ल. तिने काही दिवसांपूर्वी जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
नवी दिल्ली - हिमा दास, भारताची नवी गोल्डन गर्ल. तिने काही दिवसांपूर्वी जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आणि तिच्या कामगिरीची चर्चा जगभर झाली. त्या नव्या दमाच्या खेळाडूंसाठी अॅथलेटिक्स महासंघाने सराव करण्यासाठी प्राग, चेक रिपब्लिक आणि थिम्पु, भुतान येथे पाठवले होते.
हिमा दास ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली की, ‘मी ४०० मीटर पात्रता फेरीत मध्ये ५१ सेकंड चा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करून पहुचले. मी फॉर्म मध्ये आहे, पदक जिंकण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी माझा सराव प्राग (चेक रिपब्लिक) येथे कोच गलीना बुखारींनाचा (अमेरिका) मार्गदर्शनात उत्तम झाला. राष्ट्रकुल ४०० मीटर स्पर्धेत मी सहावी आले, पदक जिंकू शकले नाही म्हणून काहीशी निराश होते.’
आपल्या प्रशिक्षक कोच बुकरीना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या सुधारणा झाल्या आहे, त्यांचा परिणाम मला जाणवत आहे. विश्व ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी शेवटच्या १०० मीटर साठी माझी शक्ती सांभाळून ठेवते आणि तेव्हा सर्वस्व देऊन जिंकण्याचा प्रयत्न करते. सराव दरम्यान माझ्या खेळात खूपच फरक पडला. माझी स्पर्धा ही फक्त माझ्यासाठीच आहे, मी एकदा धावायला लागले तर मला कोणाचीच भीती नसते. माझे ध्येय आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम वेळ नोंदवण्यावर आहे. वेळ चांगली नोंदवली गेली तर पदक नक्कीच जिंकेल. मी मिश्र रिले स्पर्धेचे स्वागत करते, खेळामध्ये नवीन नियमामुळे उत्सुकता आणि लोकप्रियता वाढते.
मी मध्ये मिश्र रिले स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई गेम्स एकाच वर्षी असल्यामुळे खेळाडूंना खेळ करणे थोडे अवघड जाते. दोन्ही स्पर्धांमध्ये अंतरसुद्धा जास्त नसल्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागली. हिमा फक्त १८ वर्षांची आहे, तिला अजून खूप प्रशिक्षण आणि शिकायची गरज आहे. हिमा कडे नैसर्गिक प्रतिभा आहे, तिचा मध्ये जगातील सर्वश्रेष्ठ अॅथलिट बनण्याची क्षमता आहे. तिच्याकडून पदकाची अपेक्षा तर आहेच. तिच्याकडे बहारीनच्या सलावा इदी नासेरकडून ४०० मीटरमध्ये आव्हान मिळण्याची शक्यता आहे. २०२०च्या टोकियो आॅलिम्पिकपर्यंत हिमा दास ही मोठी अॅथलिट होईल. - गलिना बुखारीना, हिमा दासच्या प्रशिक्षक