महत्त्वाचे पान १ -अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!
By Admin | Published: January 3, 2015 12:35 AM2015-01-03T00:35:39+5:302015-01-03T00:35:39+5:30
अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!
अ िरिक्त सोने खरेदी देशाला घातक!पंतप्रधान : सोने आयातीत जगभरात भारत दुसर्या क्रमांकावरमुंबई : सोने म्हणजे सुरक्षितता अशी लोकांची मानसिकता असून, यामुळे लोक गरजेपेक्षा जास्त सोनेखरेदी करत आहेत. परंतु, अतिरिक्त सोन्याची खरेदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. सोनेखरेदीसंदर्भातील ही मानसिकता न बदलली गेल्यास आणि ही अतिरिक्त खरेदी न रोखली गेल्यास याचा विपरित दूरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे दिला. खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळख असलेल्या आयसीआयसीआय बँकेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने इंधनावरील आयात खर्चात कपात झाली असली तरी सोन्याची आयात आणि खरेदी हा सरकारच्या दृष्टीने डोकेदुखीचा मुद्दा आहे. जगात सोन्याच्या आयातीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारतामध्ये सोन्यामुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण कमी करण्यासाठी आजवर आयात शुल्कात घसघशीत वाढ करण्यासोबत अनेक कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. मात्र, तरीही सरत्या वर्षात देशात जवळपास ८५० टन सोन्याची आयात झाली आहे. यासंदर्भात अनेक आर्थिक विश्लेषण संस्थांनी इशारेही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याचे पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)