भारताविरुद्ध संघर्ष न करताच पराभव पत्करला - इम्रान खान

By admin | Published: June 5, 2017 02:30 PM2017-06-05T14:30:35+5:302017-06-05T15:07:04+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला 124 धावांनी लोळवतं एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरावरुन कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Impressed without a fight against India - Imran Khan | भारताविरुद्ध संघर्ष न करताच पराभव पत्करला - इम्रान खान

भारताविरुद्ध संघर्ष न करताच पराभव पत्करला - इम्रान खान

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला 124 धावांनी लोळवतं एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरावरुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण पाकिस्तानचा पराभव माजी करणधार इम्रान खानला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसले. पाकिस्तानच्या पराभवावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना आपल्याला दुख झाल्याचे कबुल केले आहे. काल सामना संपल्यानंतर त्यांनी याबबात ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही निशाना साधला. त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.

(महामुकाबल्यात भारत विजयी, पाकिस्तानचा 124 धावांनी उडवला धुव्वा)  (युवराजने पाकिस्तानविरोधातील खेळी कॅन्सर पीडितांना केली समर्पित) 

पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज असल्याते त्यांनी ट्विटच्या माध्यमांतून सांगितले. ते म्हणतात, ही सुधारणा होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाच्या स्तरातील अंतर आणखी वाढेल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलंय की, खिलाडूवृत्तीची मला जाणीव आहे. त्यामुळे विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मला मान्य आहे. पण पाकिस्तानने भारताविरुद्ध संघर्ष न करता पराभव पत्करला. त्यामुळे हा पराभव वेदना देणारा असाच होता.
यावेळी त्यांनी आपल्या गोलंदाजांवक निशाना साधाला , पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजांनी निराश केल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी देखील नांगी टाकल्याचे दिसले. सलामीवीर अझर अली आणि मोहम्मद हाफीज यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज बर्मिंगहॅमच्या मैदानात तग धरु शकला नाही.

(युवराजला खेळताना पाहून मी क्लब क्रिकेटर असल्याचं वाटत होतं - विराट कोहली) 

Web Title: Impressed without a fight against India - Imran Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.