महाराष्ट्राच्या खेळाडूंची किक बॉक्सिंगमध्ये छाप, खेळाडूंनी जिंकली ४ सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदकं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:00 AM2017-09-18T05:00:13+5:302017-09-18T05:01:00+5:30

रायपूर येथे नुकताच झालेल्या वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदक जिंकताना छाप पाडली.

The impression in the kickboxing of the Maharashtra players, the players won, 13 medals, including four gold medals | महाराष्ट्राच्या खेळाडूंची किक बॉक्सिंगमध्ये छाप, खेळाडूंनी जिंकली ४ सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदकं

महाराष्ट्राच्या खेळाडूंची किक बॉक्सिंगमध्ये छाप, खेळाडूंनी जिंकली ४ सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदकं

googlenewsNext

मुंबई : रायपूर येथे नुकताच झालेल्या वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदकांसह एकूण १३ पदक जिंकताना छाप पाडली. रायपूर येथील सरदार बलबीर सिंग जुनेजा बंदिस्त स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना शितो रियू स्पोटर््स कराटे आणि किकबॉक्सिंग संघटनेच्या खेळाडूंनी छाप पाडत ४ सुवर्ण पदकांसह ५ रौप्य व ४ कांस्य पदकांची कमाई केली. दक्ष शेट्टी, यशराज शर्मा, अभिजीत पटेल आणि आर्या गुलदेकर यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. विघ्नेश मुरकर, प्रीती शेट्टी, तेजल बेडमुथा व लॅबिन जेम्स यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अथिवा लाड, महेंद्रराज नाडार व संतोष गुलदेकर यांनी कांस्य पटकावले.

Web Title: The impression in the kickboxing of the Maharashtra players, the players won, 13 medals, including four gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.