भारताचे फिफा मानांकनामध्ये स्थान सुधारले
By admin | Published: January 8, 2016 03:33 AM2016-01-08T03:33:25+5:302016-01-08T03:33:25+5:30
सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने फिफा मानांकनामध्ये ३ स्थानांनी सुधारणा केली. भारतीय संघ ताज्या क्रमवारीमध्ये १६३व्या स्थानी आहे.
नवी दिल्ली : सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने फिफा मानांकनामध्ये ३ स्थानांनी सुधारणा केली. भारतीय संघ ताज्या क्रमवारीमध्ये १६३व्या स्थानी आहे.
भारताने ३ जानेवारी रोजी तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या
गेलेल्या सॅफ कप फायनल्समध्ये अफगाणिस्तानचा ३-२ असा पराभव केला. यापूर्वी गटसाखळीत भारताने श्रीलंका आणि नेपाळ यांचा,
तर उपांत्य फेरीत मालदीवचा
पराभव केला होता. भारताच्या खात्यावर १३९ मानांकन गुणांची
नोंद आहे.
गेल्या माहिन्याच्या तुलनेत
७ गुण अधिक आहेत. भारत आशियाई संघांमध्ये ३१व्या स्थानी आहे. त्यात इराण जागतिक क्रमवारीत ४३व्या स्थानी आहे. एकूण विचार करता, बेल्जियम मानांकनामध्ये अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, चिली
आणि ब्राझील या संघांचा क्रमांक येतो. (वृत्तसंस्था)