Paris Olympic 2024 : सात्विक-चिराग फ्रेंचच्या जोडीवर भारी; भारतीय शिलेदारांची विजयी सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 09:15 PM2024-07-27T21:15:08+5:302024-07-27T21:16:20+5:30
ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून पहिली आशावादी बातमी समोर आली.
Paris Olympic 2024 Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंसाठी चढ-उताराचा राहिला. काही शिलेदारांना पहिल्या फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. तर मनू भाकर, लक्ष्य सेन आणि हरमीत देसाई या त्रिकुटाने विजय संपादन केला. यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने भर घातली. बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी फ्रेंच जोडीचा पराभव केला. कॉर्वी आणि लाबर यांच्याशी झालेल्या लढतीत भारतीय शिलेदारांनी विजय नोंदवला.
सात्विक आणि चिराग यांनी चमकदार कामगिरी करत पहिला गेम जिंकला. त्यांनी पहिल्या गेममध्ये फ्रेंच जोडी कोर्वी आणि लाबरचा २१-१७ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये कडवी झुंज देणारी फ्रेंच जोडी दुसऱ्या गेममध्ये ढेपाळल्याचे दिसले. दुसऱ्या गेममध्ये २१-१४ अशा फरकाने विजय मिळवून सात्विक आणि चिरागने सामना जिंकला.
𝐉𝐮𝐬𝐭 𝐢𝐧: 𝐒𝐚𝐭𝐰𝐢𝐤 & 𝐂𝐡𝐢𝐫𝐚𝐠 𝐬𝐭𝐚𝐫𝐭 𝐨𝐟𝐟 𝐭𝐡𝐞𝐢𝐫 𝐏𝐚𝐫𝐢𝐬 𝐎𝐥𝐲𝐦𝐩𝐢𝐜𝐬 𝐜𝐚𝐦𝐩𝐚𝐢𝐠𝐧 𝐰𝐢𝐭𝐡 𝐬𝐭𝐫𝐚𝐢𝐠𝐡𝐭 𝐠𝐚𝐦𝐞 𝐰𝐢𝐧.
— India_AllSports (@India_AllSports) July 27, 2024
Satchi beat home-favorite & WR 43 Corvee/Labar 21-17, 21-14. #Badminton#Paris2024#Paris2024withIASpic.twitter.com/chYQcWYWkq
ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. खरे तर भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.
मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सातत्य दाखवत तिने नेमबाजी करताना तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळवले. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतात. मनूला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले मात्र, भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवानच्या पदरी निराशा पडली अन् तिला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.