३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा; यजमान महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 05:25 PM2022-10-29T17:25:20+5:302022-10-29T17:25:44+5:30

३२व्या बाल राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडचा पराभव केला.

In the 32nd Juvenile National Kho Kho competition Maharashtra girls beat Uttarakhand | ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा; यजमान महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय

३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा; यजमान महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय

googlenewsNext

मुंबई : भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्रखो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झाली असून ही स्पर्धा दोन नोव्हेंबरपर्यंत चालेल. आज झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडचा डावाने पराभव करत शानदार विजयी सलामी दिली.      

आज झालेल्या सामन्यात गतविजेत्या महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडचा २०-१ असा एक डाव राखून १९ गुणांनी  धुव्वा उडविला. महाराष्ट्राच्या दिपाली कंकने २:४० मि. नाबाद संरक्षण करत अतिशय शिताफीने ३ गुण मिळवताना कर्णधाराची खेळी करताना प्रेक्षकांना मैदनवर खिळवून ठेवले. गतविजेत्यांचा थाट काय असतो हे दाखवताना धनश्री तामखडेने ४:२० मि. संरक्षण करताना ३ गुण देखील मिळवत अष्टपैलू खेळी केली. स्वप्नाली तामखडे हिने आपल्या धारदार अक्रमणात ४ गुण मिळवले. या दोघींना जोरदार साथ देताना मृणमयी नागवेकर, संचिता गायकवाड व विद्या तामखडे यांनी प्रत्येकी ३-३ गुण मिळवत ‘हम भी किसीसे कम नही’ या आविर्भावात खेळ केला. तर उत्तराखंडच्या स्नेहानेच बर्‍यापैकी खेळ केला.      

दुसऱ्या सामन्यात विदर्भाच्या मुलांनी हिमाचल प्रदेशचा १३-७ असा एक डाव व ६ गुणांनी पराभव केला. विदर्भच्या कृष्णा तायडे (३.३० मि. व १.१० मि. नाबाद संरक्षण) व मोहित नेवारे (२ मि. नाबाद व २.२० मि. संरक्षण)  यांची खेळी संघास विजय मिळवून देणारी ठरली. कोल्हापूरच्या मुलांनी केरळवर १७-११ अशी मात केली. राजू पाटीलने चार गडी बाद करीत दोन मिनिटे संरक्षण केले. त्यांच्या मुलींनीही उत्तरप्रदेशवर १३-६ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. अष्टपैलू कामगिरी करणारी चैत्राली वाडेकर ही त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली. चैत्रालीने पहिला डावात ४.३० मिनिटे व दुसऱ्या डावात दोन २.२०मिनिटे नाबाद पळती करत आक्रमणात चार गडी टिपले.

अन्य निकाल

 मुले : उत्तर प्रदेश विजयी वि. दिल्ली २२-११ डावाने,  हरियाणा विजयी वि. तामिळनाडू १३-११ दोन मिनिटे १० सेकंद राखून, पश्चिम बंगाल विजयी वि. गुजरात १९-१३ एक डावाने.

मुली : हरियाणा विजयी वि. मध्य भारत १८-३ डावाने,  गुजरात विजयी वि. बिहार २४-० डावाने,  दिल्ली विजयी वि. हिमाचल प्रदेश १५-६  डावाने.
 

Web Title: In the 32nd Juvenile National Kho Kho competition Maharashtra girls beat Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.