न्यायालयीन क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
By admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:55+5:302016-01-24T22:19:55+5:30
Next
>जळगाव : जिल्हा न्यायालयीन क्रीडा व कल्याण संघटना आणि जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व कला महोत्सव २०१६ अंतर्गत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि क्रीडा चषकाचे उद्घाटन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर होते. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते. न्या. गंगापूरवाला यांच्याहस्ते प्रत्यक्ष फलंदाजी करुन व न्या. लव्हेकर यांनी गोलंदाजी करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. न्यायाधीश वृंद व वकील वृंद यांच्यामध्ये उद्घाटनपर सामना झाला. हा सामना न्यायाधीश वृंदाने जिंकला. त्यामध्ये जामनेर दिवाणी न्यायाधीश पठाण हे सामनावीर ठरले. त्यानंतर राज्यातून आलेल्या संघांचे ९ सामने झाले. सामने व विजयी संघ असे...-अहमदनगर वि. अकोला- अकोला जिल्हा न्यायालय विजयी. -उस्मानाबाद वि. बीड - बीड जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- आर.बी. अन्सारी.- अमरावती वि. बुलडाणा- बुलडाणा जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- प्रदीप शिंदे. - अमळनेर वि. बुलडाणा- अमळनेर विजयी, सामनावीर- मनोहर सोनार. - जळगाव जिल्हा न्यायालय वि. भंडारा- जळगाव जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- विनोद माचरे. - औरंगाबाद उच्च न्यायालय वि. मुंबई स्मॉल कॉज- औरंगाबाद उच्च न्यायालय विजयी.- सोलापूर वि. औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा न्यायालय विजयी.- भुसावळ वि. बीड- बीड जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- नवाजू अन्सारी या वेळी प्रशांत महाजन, विलास भालेराव, प्रमोद नगरकर, विजय भारंबे, भोगरे, नीलेश सूर्यवंशी, मनीष जैन उपस्थित होते.